Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ; पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या दर्जाची मिळणार सुरक्षा

मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ; पीएम मोदी आणि अमित शहा यांच्या दर्जाची मिळणार सुरक्षा
 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांची सुरक्षा आता झेड प्लस वरून Advanced Security Liason (ASL) करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इतकीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

सुरक्षा का वाढवण्यात आली ?

मोहन भागवत काही मुस्लिम संघटनांच्या निशाणावर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येतील. त्याचबरोबर ASL अंतर्गत, संरक्षित व्यक्तीच्या संरक्षणाशी संबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य आणि इतर विभाग यासारख्या स्थानिक संस्थांचा सहभाग अनिवार्य आहे. हेलिकॉप्टर प्रवासाला केवळ खास डिझाइन केलेल्या हेलिकॉप्टरमध्येच परवानगी दिली जाईल.

4 प्रकारच्या सुरक्षा श्रेणी

सुरक्षेशी संबंधित धोके लक्षात घेऊन, ही सुरक्षा गुप्तचर विभागाकडून VVIP आणि देशातील इतर क्षेत्रातील लोकांना दिली जाते. भारतात 4 प्रकारच्या सुरक्षा श्रेणी आहेत ज्यात X, Y, Z आणि Z प्लस सुरक्षा श्रेणी आहेत आणि Z प्लस श्रेणी ही सर्वात मोठी सुरक्षा श्रेणी आहे. या लोकांच्या सुरक्षेवर दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात.

भारतात, VVIPs, VIPs, राजकारणी, हाय-प्रोफाइल सेलिब्रिटी आणि खेळाडूंना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) यांच्या व्यतिरिक्त सुरक्षा पुरवली जाते. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी एनएसजीचा वापर केला जातो. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी केंद्राने शरद पवार यांची देखील सुरक्षा वाढवली होती. त्यामुळे केंद्र सरकार अचानक सुरक्षा वाढवण्याचा का निर्णय घेतंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.