बदलापूरच्या घटनेचा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीने जाहीर निषेध
सांगली : बदलापूर येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराचा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ जाहीर निषेध करीत आहे. ही दुर्दैवी घटना ज्या कर्मचाऱ्याकडून घडली तो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेला होता. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची हमी संस्थेला देता येत नाही.
ही भीती ओळखूनच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ कायम वेतनावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जावी अशी सातत्याने मागणी करीत आहे. शिक्षण संस्थांच्याकडे असलेल्या अपुऱ्या नीधीमुळे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व इतर सुरक्षिततेच्या साधनसामुग्रीची विद्यार्थ्यांना सोय उपलब्ध करून देता येत नाही. शिक्षण संस्थांना मिळणारे वेतनेत्तर अनुदान हे अतिशय कमी आहे.या वेतनेत्तर अनुदानात सर्व सुविधा उपलब्ध करणे अवघड आहे म्हणून शिक्षण मंत्र्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन वेतनेत्तर अनुदानाची रक्कम वाढवावी. जेणेकरून अशा दुर्घटनांना पायबंध घालता येईल अशी मागणी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी केली आहे. यावेळी आर. एस. चोपडे, विनोद पाटील, शिवपुत्र आरबोळे ,भारत दुधाळ, दिग्विजय चव्हाण व श्री प्रशांत चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.