Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं विधान; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, "त्या मुलींना."

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं विधान; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, "त्या मुलींना."
 
 
बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची सफाई कर्मचारी नेमणूक झाली. त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अल्पवयीन मुलींसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीने सांगितलं. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय दोन मुलींपैकी एकीने तिच्या आजोबांकडे तिने आपल्या प्रायवेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं, तेच तिने तिच्या आईकडेही सांगितलं.


घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं. ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. 


यामुळे आज बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी आज बदलापूर बंदची हाक दिली. आंदोलक आक्रमक झाले. आंदोलनांनी रेल्वे स्थानकावर येऊन ट्रकवर उतरले. त्यांनी लोकल अडवली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अशात आता या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापुरातील मनसे पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आवाहन केलं आहे.

राज ठाकरे यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. राज ठाकरेंनी पीडित मुलींना कुणी भेटायला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. ते म्हणाले, आता एकच गोष्टीची काळजी घ्या. सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलींना व त्यांच्या घरच्यांना भेटून भेटून छळतील. त्या मुलींना आयुष्यभराचा त्रास देतील. त्यांचं घर कुणाला कळणार नाही, त्यांचं नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांशी बोलून घ्या. त्यांच्या घरी कुणी जाणार नाही, त्यांना छळणार नाही, त्या मुलींना कुणी त्रास देणार नाही याची काळजी घ्या. त्या दोघींच्या पुढे आयुष्य पडलंय. त्या मुली लहान आहेत.’ असेही राज ठाकरे म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.