'लाडकी बहिण'विरूद्ध काँग्रेसची 'महालक्ष्मी'; महिलांना प्रतिमहिना देणार आठ हजार रुपये
नागपूर - महायुती सरकारची 'लाडकी बहीण' योजना सध्या चांगलीच गाजत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेल्या योजनेला प्रत्युत्तर
देण्यासाठी काँग्रेसने महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे.
या योजनेतंर्गत राज्यात सत्ता आल्यास महिलांना प्रतिमहिना आठ हजार रुपये
देण्याची घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी
केली.
बदलापूरसह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी
गुरुवारी काँग्रेसच्यावतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी
महायुती तसेच भाजप सरकार हल्ला केला. या आंदोलनात लांबा यांच्यासह
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक, माजी
मंत्री सुनील केदार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, माजी
केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आदी सहभागी झाले होते.
भाजप अत्याचाऱ्यांच्या पाठीशी
लांबा आपल्या भाषणातून थेट भाजपवर हल्ला चढवला. अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख त्यांनी केला. या सर्वांना भाजप पाठीशी घालत असल्याचाही आरोप केला. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा कायदा लागू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. महिला आरक्षणामुळे कायद्यामुळे राज्याच्या विधिमंडळात महिलांची संख्या वाढेल. महिला विरोधी अत्याचाराचे कायदे केले जातील. त्यामुळे महिलांना सुरक्षा प्रदान होईल, असा दावा केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.