Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ग्रामसभेत दलित महिला सरपंचाला बसायला खुर्ची नाकारली! उपसरपंचानं सांगितलं "जमिनीवर बसा"

ग्रामसभेत दलित महिला सरपंचाला बसायला खुर्ची नाकारली! उपसरपंचानं सांगितलं "जमिनीवर बसा"
 

भोपाळ : मध्य प्रदेशातील एका गावात ग्रामसभेत दलित महिला सरपंचाला बसण्यासाठी खुर्ची नाकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना खुर्ची तर बसायला दिलीच नाही पण खाली जमिनीवर बसायला भाग पाडलं.

त्यामुळं देशात सध्या आरक्षणविरोधी चर्चा आणि अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणावरुन मोठ्या प्रमाणावर वाद-विवाद सुरु असतानाच ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातल्या अकौना ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला आहे. या गावात ठाकूर समाजाचं प्राबल्य असताना तिथं पहिल्यांदाच सरपंच बनलेल्या २८ वर्षीय श्रद्धा सिंह या दलित महिलेवर हा प्रसंग ओढवला आहे. यापूर्वी देखील या महिला सरपंचाला ग्रामसभेत अपमानित करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला त्यांना झेंडा फडकावण्यापासून रोखण्यात आलं होतं. जातीभेदातून हा प्रकार घडल्यानं एनडीटीव्हीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
सरपंच श्रद्धा सिंह यांनी स्वतः पंचायत आणि ग्राम विकास मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पत्र लिहून आपल्याबाबत होत असलेल्या भेदभावाची तक्रार केली आहे. त्यांनी पत्रात म्हटलं की, स्वातंत्र्यदिनी ग्राम पंचायत कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरकारच्या जीआरनुसार झेंडावंदन सरपंचाच्या हस्ते होणं बंधनकारक आहे.

या सरकारी आदेशाबाबत श्रद्धा सिंह यांनी ग्रासेवक विजय प्रताप सिंह यांना सांगितलं. पण जेव्हा झेंडावंदनासाठी सरपंच श्रद्धा सिंह या ग्राम पंचायत कार्यालयात पोहोचल्या तोपर्यंत उपसरपंच धर्मेंद्र सिंह यांच्या हस्ते आधीच झेंडावंदन करण्यात आलं होतं.

हा आपल्याविरोधातील कट असून जाणीवपूर्वक आपल्याला अपमानित करण्यात आल्याचा आरोपही श्रद्धी सिंह यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या या घटनेनंतर दोन दिवसांनी १७ ऑगस्ट रोजी ग्राम सभेत घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.

या बैठकीत तिनं बसण्यासाठी खुर्ची मागितली तर उपसरपंच आणि ग्रामसेवकानं त्यांना खुर्ची देण्यास नकार दिला. जर तुम्हाला खुर्ची हवी असेल तर ती स्वतः च्या घरुन घेऊन या किंवा मग खाली फरशीवर बसा किंवा उभाच राहा, असं त्यांना सांगितलं गेलं. 'द मुकनायक' या आणखी एका न्यूज पोर्टलनं याबाबत वृत्त दिलं आहे.
श्रद्धा सिंह या जुलै २०२२ मध्ये सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या गावात सुमारे १६०० मतदान आहे. यांपैकी ५० टक्के मतदान हे ठाकूर समाजाचं आहे. तर उर्वरित ५० टक्के मतदान हे दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाचं आहे. या निवडणुकीत त्या केवळ ५८ मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांचं निवडून येणं ही गावात ऐतिहासिक घटना होती. यानंतर विरोधकांकडून जाणीवपूर्णक तणावाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. शेवटी यामध्ये एसडीएम आणि डीएम यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.