धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत परिचारिकेवर बलात्कार; दोघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
सांगली : कोल्हापूर येथे असणाऱ्या परिचारिकेस लग्नाचे आमिष दाखवून सांगलीत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अत्याचार
करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या अशा दोघांवर विश्रामबाग पोलिस
ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सचिन संभाजी गायकवाड (वय २५, रा. घुणकी,
ता. हातकणंगले) आणि अमोल कुरणे (कुंडलवाडी, ता. वाळवा) अशी संशयितांची
नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित युवती कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. ती सध्या एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. संशयित सचिन गायकवाड याने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी ओळख वाढविली. विश्वास संपादन केल्यावर संशयित सचिन याने पीडितेशी शंभर फुटी परिसरातील एका फ्लॅटमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने संशयित सचिन याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने जातिवाचक टिप्पण्णी करून लग्नास नकार दिला.दरम्यान, पीडितेने संशयितांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला; परंतु संशयित अमोल कुरणे याने सचिनसमवेत तुझे लग्न होणार नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांवर बलात्कारासह अनुसूचित जाती आणि जमाती (ॲट्रॉसिटी) अन्वये विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव अधिक तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.