आळंदीत महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या
महिला पोलीस शिपायाने इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुष्का सुहास केदार (वय-२०, रा.लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या पोलीस महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि.२५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास घडली.
आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी (दि.२५) सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अनुष्का केदार यांना नदीत शोधण्याचे काम सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळेइंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे शोधकार्यात अडचणी येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.