Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद; मसाल्यासह आता या 9 गोष्टी मिळणार, सरकारच्या योजनेत मोठा बदल

रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद; मसाल्यासह आता या 9 गोष्टी मिळणार, सरकारच्या योजनेत मोठा बदल
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते.

मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.

रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार

केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे.

 
रेशन कार्ड कसे काढणार?

जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता.

तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील.

संबंधित अधिकारी तुम्ही दिलेल्या माहितीची आणि तुमच्या अर्जाची पडताळणी करेल. त्यानंतर तो त्यावर पुढील प्रक्रिया करेल. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल आणि त्यावर तुम्हाला मोफत रेशन मिळू शकेल

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.