राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी
राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या झाल्या होत्या.
त्यानंतर, आता राज्यातील अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या
आहेत. त्यामध्ये, सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे
यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे.
त्यांना त्यांच्या पुण्यातील पदभारसह बदली करण्यात आल्याचे पत्रही सामान्य
प्रशासन विभागाकडून प्राप्त झालं आहे. त्यामुळे, आता लवकरच पुण्यातील
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार
स्वीकारतील. दरम्यान, त्यांच्यासह अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार
खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली
करण्यात आली आहे.
शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी,
स्मार्ट सिटी, पुणे या रिक्त पदावर केली आहे. आपल्या जागी कुलदीप जंगम,
भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार
जंगम, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा,
असे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्य मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मनीषा
आव्हाळे यांना पाठवले आहे.
1 अभिनव गोयल यांची नियुक्ती हिंगोली जिल्हाधिकारी या पदावर करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यांना पुण्यातील स्मार्ट सिटीची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अगोदर या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात त्यांची चर्चा रंगली आहे.2 विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर करण्यात आलीय.3 सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली आहे.4 सौम्या शर्मा चांडक मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नागपूर या पदावर करण्यात आली आहे.5 मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर करण्यात आली आहे.6 कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर करण्यात आलीय.7 प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.