एवढी मोठी भरपाईची रक्कम ऐकून न्यायाधीशही आश्चर्यचकित झाल्या. ही मागणी अवाजवी असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितले. महिन्याला एवढी रक्कम कोणी खर्च करू शकते का? हे शोषण आहे. न्यायाधीशांनी वकिलाला सांगितले की, जर तिला इतके पैसे हवे असतील तर तिला स्वत: कमवायला सांगा.
काय आहेत पत्नीच्या मागण्या?
या घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीने पतीकडून पोटगी म्हणून महिन्याला सुमारे 6 लाख 16 हजार रुपये मिळावी अशी मागणी केली आहे. या 6 लाख 16 हजार रुपयांमध्ये मासिक खर्च, 4-5 लाख रुपये मासिक गुडग्यावरील उपचार आणि फिजिओथेरपीसाठी, मासिक 15 हजार रुपये चपला व कपड्यांसाठी, 60 हजार रुपये घरातील जेवणासाठी आणि हॉटेलमध्ये जेवणासाठी आणखी काही हजार रुपये यांचा समावेश आहे.
दरम्यान या खटल्याच्या सुनावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक युजर्स महिलेच्या मागण्यांवर संताप व्यक्त करत आहेत. वकिलाचा युक्तिवाद असा होता की महिलेला तिच्या माजी पतीसारखीच जीवनशैली मिळावी. मात्र न्यायमूर्तींनी हे मान्य केले नाही. त्या म्हणाल्या, प्लीज कोर्टाला सांगू नका की एखाद्या व्यक्तीला, महिन्याला 6 लाख 16 हजार 300 रुपये इतका खर्च करावा लागतो. इतका खर्च कोणी करते का? तिला इतकाच खर्च करायचा असेल तर तिला कमवू द्या. तुमच्यावर मुलांसह कुटुंबाची कोणतीच जबाबदारी नाही. तुम्ही नियमांचा फायदा घेत नाही का?
पतीची मासिक 50-60 लाख रुपये कमाई
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मासिक 6 लाखांची पोटगी मागणाऱ्या महिलेवर टीका करत आहेत. तर काहीजण लग्नव्यवस्थेची खिल्ली उडवत आहेत. मात्र, या प्रकरणाच्या तपशिलात गेल्यावर असे समोर आले की, या खटल्यातील पती महिन्याला 50 ते 60 लाख रुपये कमावतो, त्याच आधारावर महिला मासिक 6 लाख रुपयांची पोटगी मागत असल्याचे दिसून आले. पण न्यायालयाच्या दृष्टीने हे तर्कसंगत नसल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
"पती वापरतो 10 हजारांचा टी-शर्ट"
दरम्यान या खटल्याच्या सुनावणी दरम्यान पत्नीच्या वकिलाने दावा केला की, " पती "सर्व ब्रँडेड कपडे" वापरतो. ज्यामध्ये कॅल्विन क्लेन ब्रँडचा समावेश आहे. या ब्रँडचे टी-शर्ट प्रत्येकी 10 हजार रुपयांचे आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.