वयाची 65 वर्षे पूर्ण आहेत? तुम्हाला मिळू शकतात 3 हजार रुपये! 'इथं' करा अर्ज
वयाची 65 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना सरकारकडून 3 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'तून ज्येष्ठ नागरिकांना हे आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. समाजकल्याण विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू असून ज्यांचं कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत आहे अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात.
वयोमानानुसार येणाऱ्या अशक्तपणावर उपाययोजना म्हणून आवश्यक ती साधनं, उपकरणं खरेदी करण्यासाठी तसंच मनःस्वास्थ केंद्र, योगा केंद्र, इत्यादींद्वारे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी, एकूणच ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन सर्वसामान्यपणे जगता यावं यासाठी महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' राबविण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे (ज्या नागरिकांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत.) कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असायला हवं. तसंच लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणं आवश्यक आहे. सदर व्यक्तीनं मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसह कोणत्याही सरकारी स्रोतांकडून उपकरण विनामूल्य प्राप्त केलेलं नसावं. लाभार्थ्यांनी याबाबत स्वयंघोषणापत्र सादर करणं आवश्यक असेल. तसंच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे प्राप्त झाल्यावर या योजनेंतर्गत आवश्यक उपकरण खरेदी केल्याचं प्रमाणपत्रही 30 दिवसांच्या आत सादर करणं आवश्यक असेल.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्र :
आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट साइझ 2 फोटो, उत्पन्नाचं स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेलं असावं), उपकरण किंवा साहित्याचा दुबार लाभ न घेतल्याचं स्वयंघोषणापत्र (अर्जासोबत जोडलेलं असावं), इत्यादी कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करण्याचं आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.