दारूपेक्षा जास्त विषारी आहेत 3 पदार्थ; माहीत असूनही आवडीने खातात लोक
नवी दिल्ली : लिव्हर म्हणजे यकृत हे आपल्या शरीरातील सर्वात मोठं सॉलिड ऑर्गन आहे. आपल्या दैनंदिन शारीरिक प्रक्रियांचे कार्य योग्यपणे सुनिश्चित करण्यात लिव्हरची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
डिटॉक्सिफिकेशन, चयापचय आणि प्रथिने संश्लेषण यासह 500 हून अधिक कामं लिव्हर करतं. त्यामुळे त्याला विविध अॅक्टिव्हिटींचं पॉवरहाउस म्हटलं जातं. एकूणच आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी व्यक्तीचं लिव्हर निरोगी असणं आवश्यक आहे.
लिव्हरला शरीराची रसायनशाळा देखील म्हणतात. लिव्हर ग्लायकोजेनच्या रुपात शरीरात अतिरिक्त ग्लुकोज साठवून ठेवते. जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते तेव्हा ते पुन्हा ग्लुकोजमध्ये रुपांतरित करतं. दारू आपल्या लिव्हरसाठी सर्वात घातक मानली जाते. पण, काही पदार्थ लिव्हरसाठी दारूपेक्षाही घातक ठरतात, हे अनेकांना माहिती नाही.
अल्कोहोलचा आपल्या लिव्हरवर थेट परिणाम होतो आणि फॅटी लिव्हरचे आजार होतात. अल्कोहोल प्यायल्याने लिव्हरमधील पेशींचं नुकसान होतं आणि सिरॉसिस देखील होऊ शकतो. सिरॉसिस हा गंभीर आजार असून त्यावर उपचार करणे अवघड आहे. याशिवाय, लिव्हर कॅन्सरचा धोकाही वाढतो. हार्वर्ड हेल्थनुसार (रेफ), जास्त तळलेले अन्नपदार्थ, जंक फूड आणि मिठाई खाल्ल्याने लिव्हरमध्ये फॅट्स जमा होऊ शकतात. त्यामुळे फॅटी लिव्हर आजार होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचं लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत.
कोणत्या पदार्थांनी लिव्हर होतं खराब?
साखरेचं अतिरिक्त सेवन: साखरेचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने लठ्ठपणा आणि डायबेटिस व्यतिरिक्त लिव्हरचे आजार देखील होऊ शकतात.
प्रोसेस्ड फूड: प्रक्रिया केलेल्या खाद्य पदार्थांमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. ती लिव्हरला हानी पोहोचवू शकतात. पनीर, डबाबंद भाज्या, ब्रेड, पेस्ट्री, पाय, केक, सॉसेज रोल आणि तत्सम प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. हेपॅटोटॉक्सिक औषधे लिव्हरला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत.
लिव्हर खराब होण्याची इतर कारणे
हिपॅटायटिस: लठ्ठपणा, टाइप 2 डायबेटिस आणि हाय कोलेस्ट्रॉल इत्यादींमुळे हिपॅटायटिस होऊ शकतो.
जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता: काही जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळेही लिव्हरचे आजार होऊ शकतात.
वातावरण प्रदूषण: हवा आणि पाण्यात असलेले प्रदूषकांमुळे देखील लिव्हरचे आजार होतात.
हिपॅटायटिस बी आणि सी: या विषाणूंमुळे लिव्हरवर सूज येऊ शकते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
नॉन-अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD): लठ्ठपणामुळे हे आजार होतात.
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
संतुलित आहार घ्या: फळे, भाज्या, होल ग्रेन्स आणि कमी फॅट असलेला प्रोटिनयुक्त आहार घ्या.
अल्कोहोलचे सेवन कमी करा: अल्कोहोलचे सेवन कमी करा किंवा ते पूर्णपणे थांबवा.
वजन नियंत्रित करा: वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.
हिपॅटायटिसचं लसीकरण करा: हिपॅटायटिस बी आणि सी साठी लसी घ्या.
निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा: तणाव कमी करा, पुरेशी झोप घ्या आणि नियमित आरोग्य तपासणी करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.