Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, हा संतापजनक प्रकार?

महाराष्ट्र पुन्हा हादरला! अवघ्या 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार हा संतापजनक प्रकार?
 

महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या जखमा नागरिकांच्या मनात ताज्या असतानाच आता कल्याणमध्येही अशाच प्रकारची संतापजनक घटना घडली.

अंगणात खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही संतापजनक घटना कल्याणजवळील टिटवाळा दहागाव परिसरात घडली. मुलगी रडत घरी गेल्यानंतर आई-वडिलांनी तिची विचारपूस केली, असता हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधमाला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली शुक्रवारी दुपारच्या सुमारास घराबाहेर खेळत होती.

त्याचवेळी परिसरातील एक नराधम आला. याने निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर त्याने चिमुकलीला सोडून दिले. वेदना असह्य झाल्यानंतर चिमुकली रडत रडत घरी आली. आई-वडिलांनी तिला याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. पण लहान असल्याने ती काहीच सांगू शकली नाही.

चिमुकलीच्या अंगावर कुठे दुखापत झाली तर नसावी, असा संशय कुटुंबियांना आला. त्यांनी तिची पाहणी केली असता घडलेला प्रकार लक्षात आला. आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच तपासाची चक्रे फिरवत आरोपीला काही तासातच अटक केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.