संभाजीनगर जिल्ह्यात बदलापूरची पुनरावृत्ती, आश्रमातील 2 अल्पवयीन मुलींवर महाराजाकडून अत्याचार
बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण आहे. बदलापूरसारख्या संतापजनक घटना राज्यातील अन्य भागामध्येही घडत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही या प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
काय आहे प्रकरण?
आश्रमातील दोन अल्पवयीन अल्पवयीन मुलींवर तेथील महाराजानं लैगिंक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारातील आश्रमातील ही घटना आहे. दादासाहेब अकोलकर असं या नराधम महाराजाचं नाव आहे. मुलींवर अत्याचार करणाऱ्या महाराजावर कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आश्रमातील इतर मुलींसोबत देखील लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
'आरोपींचं कापून टाकलं पाहिजे'
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदलापूर प्रकरणात बोलताना आरोपींचं गुप्तांग कापून टाकलं पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. पल्या आई-बहिणींवर हात टाकणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं तर अशा आरोपींच गुप्तांगच कापलं पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं.'जो चुकीचा वागेल त्याला शासन झालं पाहिजे. मग तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असूद्या त्याची फिकीर आम्ही करणार नाही. आरोपीला कडक शासन करणार. आमचा प्रयत्न चालला आहे की, शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पारित होण्यासाठी गेला आहे. तो लवकर मंजूर करुन घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असं अजित पवार यांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.