संतापजनक! डॉक्टरकडून 20 वर्षीय नर्सवर बलात्कार; खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
कोलकाता येथील ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशातही एक संतापजनक घटना घडली. एका विवाहित डॉक्टरने 20 वर्षीय नर्सवर बलात्कार केला. मुराबाद येथील खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉक्टरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी डॉक्टरला अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा कसून शोध घेतला जातोय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 20 वर्षांची असून ती मुराबाद येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते.
शनिवारी रात्री पीडिता ड्युटीवर असताना रुग्णालयातील डॉक्टर शाहनवाज याने तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं. पीडिता कॅबिनमध्ये गेली असता, आरोपीने तिच्यासमोर अश्लील कृत्य केलं. यानंतर पीडितेने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वॉर्ड बॉय जुनैद आणि मेहनाज यांनी तिला जबरदस्तीने रुग्णालयातील वरच्या खोलीत नेले.त्यानंतर डॉ. शाहनवाज याने पीडितेचा हातपाय बांधून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. रविवारी सकाळी पीडितेने कशीबशी डॉक्टरच्या तावडीतून आपली सुटका करत थेट घर गाठलं. घडलेल्या सर्व प्रकार पीडितेने आपल्या वडिलांना सांगितला.वडिलांनी तातडीने रुग्णालय गाठत डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपी डॉ. शाहनवाज याला अटक केली. त्याचे दोन्ही साथीदार सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.