Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

13 वर्षांची मुलीचे अपहरण करून 3 जणांनी रात्रभर केले अत्याचार

13 वर्षांची मुलीचे अपहरण करून 3 जणांनी रात्रभर केले अत्याचार
 
 
वाशिमच्या रिसोड शहरा नजीकच्या मुंगसाजी नगर येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तीन आरोपींना रिसोड पोलिसांनी अटक केलीय.

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. रिसोड शहरापासून जवळच असलेल्या मुंगसाजी नगर येथील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना 20 ऑगस्ट 2024 रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर 20 ऑगस्ट 2024 रोजी उभी होती. मुख्य आरोपी पंढरी फुफाटे आणि त्याचे सहकारी गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे या तिघांनी त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मुंगसाजी नगर पासून जवळच असलेल्या टेकडीवर असलेल्या झोपडीत नेले. तिथे नराधम पंढरी फुफाटे आणि त्याचे 2 सहकारी गणेश फुफाटे आणि सूर्यभान फुफाटे यांनी रात्रभर अत्याचार केला असा आरोप अल्पवयीन मुलीने केलाय. ही मुलगी दुसऱ्या दिवशी 21 ऑगस्ट 2024 रोजी घरी परतल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

अल्पवयीन मुलीने अत्याचार झाल्याचं आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी रिसोड पोलीस स्टेशन गाठले. पोलिसात तक्रार दाखल केल्यावर रिसोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिन्ही आरोपींना 22 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी पंढरी फुफाटे हा एका 6 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी असून तो मागील 1 वर्षांपासून फरार होता.

या प्रकरणात अत्याचारग्रस्त मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार ( बलात्कार ) झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे वाशिम जिल्हा हादरला असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन ऐरणी वर आला आहे. या घटनेचा पुढील तपास रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्यासह त्यांचे सहकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घाटे,पोलीस कर्मचारी सुशील इंगळे रुपेश मस्के गणेश जाधव करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.