Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

12 वर्षाच्या मुलीला शाळेत जाऊ देत नाही महेश बाबू! काय आहे नेमकं कारण?

12 वर्षाच्या मुलीला शाळेत जाऊ देत नाही महेश बाबू! काय आहे नेमकं कारण?
 

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरची लेक सितारा घट्टामनेनी ही सतत चर्चेत असते. वयाच्या 12 व्या वर्षीच सितारानं तिच्या पर्सनॅलिटीनं सगळ्यांची मने जिंकली.

महेश बाबूच्या लेकीनं आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला असून तिला देखील यशस्वी स्टार व्हायचं आहे. त्याची सुरुवात एका जाहिरातीतून झालीये. सितारा टाईम्स स्क्वेअरवर देखील झळकली आहे. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं खुलासा केला की महेश बाबूची इच्छा आहे की तिनं शाळेत जाऊ नये.

सितारानं 'आयड्रीम मीडिया'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सिताराला विचारलं की ती नेहमी शाळा बंक करते? यावर तिनं खुलासा केला की ती अर्ध क्लास बंक करते आणि त्याचं कारण तिचे वडील महेश बाबू आहे. सितारानं सांगितलं की जेव्हा तिच्या वडिलाकडे काही काम नसतं, तेव्हा तो सिताराला शाळेत न पाठवण्यासाठी नम्रताला मनवतो. सितारानं याला प्रेम म्हटलं आणि सांगितलं की ते एकत्र खूप मस्ती करतात. सितारानं महेशला तिचा हीरो म्हटलं आणि सांगितलं की तिनं त्याचे सगळे चित्रपट हे थिएटरमध्ये पाहिले आहेत.
सितारानं पुढे सांगितलं की 'अर्धावेळ मी माझ्या वडिलांमुळे शाळा बंक करते. ज्या दिवशी त्यांच्याकडे काही काम नसतं तेव्हा ते असं करतात. ते असं का करतात हे मला माहित नाही. ते माझ्या आईला मला शाळेत न पाठवण्यासाठी मनवतात. ते खूप चांगले आणि प्रेमळ आहेत. आम्ही एकत्र मज्जा करतो. मी त्यांचे सगळे चित्रपट पाहते. मी नुकताच त्यांचा मुरारी चित्रपट पाहिला. त्यांचा हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर मी तो लगेच पाहिला.'

पुढे भाऊ गौतमला लीड रोल करताना पाहण्याची इच्छा असल्याचं तिनं सांगितलं. दरम्यान, गौतमनं लहाण असताना '1: नेनोक्कडाइन' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सितारानं पुढे गौतमविषयी सांगितलं की तो सध्या न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये त्याचं पुढचं शिक्षण पूर्ण करतोय आणि चार वर्षांचा कोर्स करत आहेत. सितारा देखील अभिनयाचे धडे घेत असल्याचं तिनं सांगितलं.

सितारा विषयी बोलायचं झालं तर तिनं एक जाहिरात करण्यासाठी 1 कोटी मानधन म्हणून घेतले होते. तिमं ही जाहिरात एका ज्वेलरी ब्रॅंडची केली होती. त्यातून मिळालेले हे 1 कोटी रुपये तिनं दान केले होते. त्यामुळे सगळीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.