Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! एकाच शाळेतील 11 शिक्षकांना ब्रेन ट्युमर; कसं शक्य आहे? प्रशासनात खळबळ

धक्कादायक! एकाच शाळेतील 11 शिक्षकांना ब्रेन ट्युमर; कसं शक्य आहे? प्रशासनात खळबळ
 

भोपाळ : एखादा व्हायरस दुसऱ्यापर्यंत पसरतो. त्यामुळे एखाद्या व्हायरसची लागण झाली की त्याच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्यालाही होतं. ब्रेन ट्युमरसारख्या आजाराबाबत असं काही घडत नाही. पण तुम्हालाही धक्का बसेल एका शाळेतील अकरा शिक्षकांना ब्रेन ट्युमर झाला आहे.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशच्या रेवामधील हे धक्कादायक प्रकरण आहे. रेवा येथील बडराव गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील हे प्रकरण. येथील 11 शिक्षकांनी आपल्याला ब्रेन ट्युमर असल्याचं सांगितलं. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी याची दखल घेत चौकशीही केली. त्याच्या चौकशीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. त्यांनी घाईघाईत वैद्यकीय चाचणीचे आदेश दिले. त्यांचा आदेश निघताच रेवाच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली.

शिक्षकांच्या वैद्यकीय चाचणीचे आदेश

जिल्हाधिकारी प्रतिभा पाल यांना याची माहिती मिळताच त्यांनी सर्वांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. आपली वैद्यकीय चाचणी होणार हे समजताच 11 शिक्षकांनी आपलं स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतर शिक्षकांनी याचं खापर कॉम्प्युटरवर फोडलं. ते म्हणाले की, आम्ही आजारी नाही. कॉम्प्युटरनं आपोआप निदान केलं आम्हाला ब्रेन ट्युमर आहे. शिक्षकांच्या या स्पष्टीकरणाचीही चौकशी केली जात आहे.

हा कॉम्प्युटरमधील व्हायरसचा परिणाम?
या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणाले की, कॉम्प्युटरमध्ये हे फीडिंग 2022 साली करण्यात आलं होतं. आता आजारी असल्याचं सांगून शिक्षकांना खाऊ घालण्याचे प्रकार कसे घडले, याचा शोध घेतला जात आहे. आता इथं प्रश्न उपस्थित होत आहे की, संगणक कोणत्या व्हायरसने ग्रस्त आहे, ज्याने त्याच शाळेतील 11 शिक्षकांना ब्रेन ट्युमर असल्याचं घोषित केलं आहे.

ज्या शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत, अशा शाळांमध्ये शिक्षण विभाग एका शाळेत जास्त शिक्षक पाठवत आहे. त्यामुळे ही पदस्थापना टाळण्यासाठी शिक्षक कारणं देत आहेत. शिक्षकांनी सबब सांगण्यापूर्वी विचार न करता माहिती दिल्याने या प्रकरणातील वाद वाढला. एकाच शाळेतील एवढ्या शिक्षकांना एकाच आजाराने कसे ग्रासले असेल याचा कोणी विचार केला नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.