नेपाळ अपघातग्रस्त बसमधील सर्वच प्रवाशी महाराष्ट्रातील; 110 जणांचा होता ग्रुप,42 जणं वाहून गेल्याची माहिती
पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटक बस मुखलिसपूरजवळ नदीत कोसळल्याची घटना घडलीय. गोरखपूरच्या केसरवाणी ट्रॅव्हल बसमध्ये महाराष्ट्रातील ४२ प्रवासी प्रवास करत होते. गोरखपूरमधील चालकासह १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
केसरवाणी ट्रॅव्हल्स, गोरखपूर येथून बुक केलेल्या बसमध्ये महाराष्ट्रातील ४२ पर्यटक होते. सर्व प्रवासी नदीत वाहून गेल्याची माहिती आहे. आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तरंग चौकाजवळ असलेल्या कार्यालयात चारू नावाच्या महिलेने केसरवाणी ट्रॅव्हलच्या दोन बस आणि एक ट्रॅव्हलर गाडी पर्यटनासाठी बुक केलं. येथून सर्व गाड्या प्रयागराज रेल्वे स्थानकावर पाठवण्यात आल्या, तेथून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा गट चित्रकूटला गेला होता. तेथून अयोध्या आणि लुंबिनीमार्गे नेपाळमधील पोखरा येथे पोहोचले. आज सगळे काठमांडूला जाणार होते. त्याच दरम्यान त्यांचा अपघात झाला.
बस मुखलिसपूरजवळ आल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यानंतर बस दरीत कोसळली या बसमध्ये ४२ जण होते. या अपघातात गोरखपूरचा पिपराइच, चालक मुर्तुजा उर्फ मुस्तफा, रहिवासी भगवानपूर (तुरवा) आणि महाराष्ट्रातील १६ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये बस दरीत कोसळल्याची माहिती मिळाली असून यासंदर्भातील अधिकची माहिती संकलित करण्यात येत आहे.चारू नावाच्या महिलेने गोरखपूरमधील तरंग चौकातील केसरवाणी ट्रॅव्हल्स कार्यालयात ट्ररिस्ट बस बूक केली होती होती. सर्व लोक प्रयागराजमधून बसमध्ये बसले होते. येथे ते चित्रकूटला गेले त्यानंतर ते इतर पर्यटस्थळावर गेल्या माहिती मिळालीय. अपघात होण्यापूर्वी सर्व प्रवासी नेपाळच्या दिशेने निघाले होते. पर्यटकांची बस पोखरातून काठमांडूला निघाली होती. स्थानिक पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी अबू खैरेनी घटनास्थळी पोहोचलेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.