सुप्रीम कोर्टात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! 'या' पदासाठी निघाली भरती, पगार तब्बल 60 हजार महिना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी गोड बातमी समोर येत आहे. सुप्रीम कोर्टात काही रिक्त पदांसाठी नोकर भरती निघाली आहे. यासाठी दहावी पास उमेदवार देखील पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुम्ही दहावी पास असाल आणि सुप्रीम कोर्टात नोकरी करायची असेल तर
तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीची नोटिफिकेशन नुकतीच जारी
करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या भरतीसाठी कोण अर्ज करण्यास
पात्र राहणार आहे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांसारख्या सर्वच बाबींची
तपशीलवार माहिती पाहणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती
सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या नोकर भरती अंतर्गत जूनियर कोर्ट अटेंडंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मात्र ज्याला स्वयंपाकाचे ज्ञान, ज्याने पाककला क्षेत्रात शिक्षण घेतले आहे त्यालाचं यासाठी अर्ज करता येणार आहे.
किती जागा भरल्या जाणार ?
या पदभरतीअंतर्गत 80 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता ?
या पदासाठी किमान 10वी पास उमेदवार सोबतच पाककला डिप्लोमा धारक उमेदवार पात्र राहणार आहे. मात्र पात्र उमेदवाराला या कामाचा 03 वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
वयोमर्यादा कशी राहणार ?
या पदासाठी खुल्या प्रवर्गातील 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 05 वर्षे आणि OBC च्या उमेदवारांना तीन वर्षाची सूट दिली जाणार आहे.
शुल्क किती भरावे लागेल ?
जनरल अन ओबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 400 रूपये आणि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम कॅटेगरीतील उमेदवारांकडून 200 रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार
या भरतीसाठी अजून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. 23 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. 23 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या कालावधीत यासाठी अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज कुठं करणार ?
या नोकर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. https://www.sci.gov.in/recruitments/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
जाहिरात कुठे पाहणार ?
सुप्रीम कोर्टाने या पदभरतीची जाहिरात काढली आहे. ही जाहिरात https://drive.google.com/file/d/1dn4e1CgVe51hQyoK9W0mAathN9RW3weT/view?usp=sharing या लिंकवर उपलब्ध आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.