Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय दत्तनें बायकोचे नको ते Video डिलीट करण्यासाठी मोठी रक्कम मोजली, लग्नाआधी अशी करायची मान्यता

संजय दत्तनें बायकोचे नको ते Video डिलीट करण्यासाठी मोठी रक्कम मोजली, लग्नाआधी अशी करायची मान्यता 


अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आज मान्यता हिचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या लग्नाआधीच्या आयुष्याबद्दल चर्चा रंगली आहे. मान्यता दत्त हिचा जन्म 22 जुलै 1978 मध्ये एका मुस्लीम कुटुंबात झाला.
मान्यता हिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे. सध्या मान्यता संजय दत्त प्रॉडक्शनची सीईओ म्हणून काम पाहात आहे. पण मान्यता हिला प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ सिनेमातील आयटम सॉन्गमुळे ओळखलं जातं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मान्यता दत्त हिच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे.

मुस्लीम कुटुंबात जन्माला आलेल्या मान्यता हिला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री व्हावं अशी मान्यता हिचं स्वप्न होतं. पण मान्यता हिचं स्वप्न पूर्ण झालं नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे मान्यता हिने बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले.
दरम्यान, मान्यता आणि संजूबाबा यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत त्यानंतर प्रेमात झालं. मान्यता हिने बी-ग्रेड सिनेमांमध्ये काम करणं संजूबाबाला आवडत नव्हतं. त्यामुळे संजूबाबाने सिनेमांचे राईट्स विकत घेतले. त्यासाठी अभिनेत्याला मोठी किंमत मोजावी लागली.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, संसूबाबाने पत्नीच्या बी ग्रेड सिनेमाचे सर्व राईट्स विकत घेतले. यासाठी अभिनेत्याने तब्बल 20 लाख रुपये मोजले होते. बायको सर्व नको ते व्हिडीओ मिटवण्यासाठी अभिनेत्याने सर्व प्रयत्न केले. सांगायचं झालं तर, एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त मान्यता – संजय दत्त यांच्या नात्याची चर्चा रंगली होती.

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर संजय दत्त आणि मान्यता यांनी 2008 मध्ये लग्न केले. अगदी साध्या पद्धतीत दोघांचं लग्न झालं. संजय दत्त याने वयाच्या 50 व्या वर्षी तिसरं लग्न केलं. आज संजय – मान्यता दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. अनेक ठिकाणी अभिनेत्याला कुटुंबासोबत स्पॉट देखील केलं जातं.
सांगायचं झालं तर, मान्यता दत्त ही संजय दत्त याची तिसरी पत्नी आहे. दोघांमध्ये 21 वर्षांचं अंतर आहे. मान्यता अभिनेता संजय याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. आज मान्यता हिचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र तिच्या चर्चा रंगल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.