Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नोकरी शोधून शोधून थकला, नोकरी काय मिळेना :, मुलाने असां T- Shirt घेतला, नोकरीसाठी कंपनीच्या लागल्या रांगा

नोकरी शोधून शोधून थकला, नोकरी काय मिळेना :, मुलाने असां T- Shirt घेतला, नोकरीसाठी कंपनीच्या लागल्या रांगा 


नवी दिल्ली : शिक्षण संपलं की अनेक जण नोकरीच्या शोधात असतात. काही लोकांना नोकरी लगेच मिळते. तर काहींना खूप भटकावं लागतं. आजही कित्येक लोक आहेत. जे बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे नोकरी नाही. असाच एक मुलगा ज्याने नुकतंच शिक्षण पूर्ण केलं आणि तो नोकरीच्या शोधात आहे. पण शोधून त्याला नोकरी सापडली नाही. अखेरीस त्याने एक टी-शर्ट घातलं त्यामुळे त्याला नोकरी मिळाली.

चांगली नोकरी मिळावी यासाठी लोक बरीच मेहनत घेतात. आपल्यातील स्किल्स वाढवतात, सीव्ही मजबूत बनवतात. पण तरी काही जणांना नोकरी मिळत नाही. त्यापैकीच एक असलेला हा चीनमधील तरुण. सॉन्ग जियाल असं त्याचं नाव. 21 वर्षांच्या सॉन्गनं वुहान युनिव्हर्सिटीतून स्कूल ऑफ जिओमॅटिक्समधून डिग्री घेतली आहे. त्यानंतर तो नोकरी शोधू लागला.

त्याला चांगल्या ठिकाणी इंटर्नशिपची नोकरी हवी होती. त्याने अनेक ठिकाणी अर्जही केला पण तो फेटाळला गेला. नोकरी शोधून शोधून तो थकला पण नोकरी काही सापडेना. अखेर त्याने एक दिवस एक असं टी-शर्ट घातला. त्यानंतर मात्र तो कंपन्यांकडे नोकरी मागायला नव्हे तर कंपन्याच त्याच्याकडे नोकरीची ऑफर घेऊन आल्या. जॉबसाठी त्याच्यामागे कंपन्यांच्या रांगा लागल्या.

असं टी-शर्टवर होतं काय? 
ज्या टी-शर्टमुळे मुलाला नोकरीच्या ऑफर येत होत्या, ते टी-शर्ट साधंसुधं नव्हतं. तर त्यावर एक जाहीरात होती. त्याच्या गावी कामाची जाहीरात करण्यासाठी लोक फिरताना त्याने पाहिले होतो. त्यावरूनच त्याला एक आयडिया सुचली. त्याने स्वतःला प्रमोट करण्यासाठी हा खास टी-शर्ट प्रिंट करून घेतला. पांढऱ्या टी-शर्टवर त्याने त्याचा बायोडाटा आणि क्युआर कोड छापला. टी-शर्टच्या पुढच्या बाजूला लिहिलं होतं, 'मी 2024 क्लासचा आहे आणि नोकरी शोधत आहे, कृपया मागे पहा'. मागच्या बाजूला त्याचा संपूर्ण सीव्ही होता. सोबतच एक क्यूआर कोड देखील होता, जो स्कॅन होताच त्याच्याशी संपर्क साधता येतो.

हा टी-शर्ट घालून तो फिरायचा. नोकरीसाठी तो त्याचं चालतं फिरतं पोस्टर बनला. हा मुलगा हळूहळू सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची ही आइडिया यशस्वी ठरली. त्याला नोकरीच्या अनेक ऑफर मिळू लागल्या. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, अखेरीस तो रनी एपॅरल इंडस्ट्रीत नोकरीला लागला. सोशल मीडियावर लोक त्याच्या कल्पना आणि सर्जनशीलतेचे कौतुक करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.