Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऊसतोड मजुराचा मुलगा बनला RTO अधिकारी :, पण 9 हजाराची लाच घेतांना जाळ्यात अडकला

ऊसतोड मजुराचा मुलगा बनला RTO अधिकारी :, पण 9 हजाराची लाच घेतांना जाळ्यात अडकला 


नांदेड : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ऊसतोड कामगाराचा मुलगा मोटार वाहन अधिकारी बनतो. हे सर्व तरुणांसाठी प्रेरणादायीच. मात्र, सेवेतील अवघ्या ४ वर्षातच ड्रायव्हिंग ट्रायलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी ९ हजार रुपयाची लाच घेताना आरटीओ विभागातील सहाय्यक वाहन निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो आणि मेहनतीवर पाणी फिरवतो.
या घटनेने एकीकडे हळहळ तर, दुसरीकडे तिरस्कार देखील केला जात आहे. भूषण जवाहर राठोड असे लाचखोर अधिका-याचे नाव आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की, तक्रारदार हे श्री. गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून काम करत आहेत. या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकांची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत हे सर्व जण नापास झाले होते. सदर प्रशिक्षणार्थीना पास करण्याच्या मोबदल्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक राठोड यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली.
तडजोडीनंतर ९ हजार रुपये ठरले. दरम्यान, याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २५ जुलै रोजी दुपारी आरटीओ अधिकाऱ्याला ९ हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक मोटार वाहन निरीक्षक भूषण राठोड हे मूळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. राठोड यांचे वडील ऊसतोड मजूर होते. वडिलांचे निधन झाले, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुभाष राठोड यांनी एमपीएससीच्या माध्यमातून सहायक वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांना यश आलं. ४ वर्षापूर्वी सुभाष राठोड हे नांदेडच्या आरटीओ कार्यालयात रुजू झाले होते. चार वर्षाच्या सेवेतच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.