Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

OLA कॅब बुक करताच आला मेसेज, पण ड्राइव्हरचे नावं वाचताच एका फटक्यात ट्रिपच रद्द केली, वाचाच

OLA कॅब बुक करताच आला मेसेज, पण ड्राइव्हरचे नावं वाचताच एका फटक्यात ट्रिपच रद्द केली, वाचाच 


ओला, उबर यासारख्या गाड्यांच्या माध्यमातून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो. या गाड्यांचे दर तुलनेने कमी असतात आणि मोबाईल अॅपवरुन तुम्ही अगदी सहज बूक करु शकता त्यामुळे नागरिक या वाहनांनी प्रवास करण्याला प्राधान्य देतात. अशाच प्रकारे एका व्यक्तीने आपल्यासाठी ओला कॅब बूक केली. पण त्यानंतर त्या व्यक्तीला आलेला मेसेज पाहून तो चक्कावून गेला. इतकेच नाही तर त्याने आपली ट्रिपच कॅन्सल केली.


ओला आणि उबर सारख्या कंपन्यांच्या आल्यामुळे प्रवाशांचा प्रवास खूप सोपा आणि स्वस्त सुद्धा झाला आहे. अनेकजण या कंपन्यांची सेवा घेतात. तर काही जण कॅब पूक करुन नंतर काही कारणांमुळे रद्द सुद्धा करतात. कॅब रद्द करण्यामागची कारणे ही प्रत्येकाची वेगवेगळी असतात. पण आता याच्या संबंधित सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ड्रायव्हरचं नाव वाचूनच एका व्यक्तीने आपली ट्रिप कॅन्सल केली.
नेमकं काय आहे प्रकरण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना कर्नाटकमधील आहे. कर्नाटकमधील एका तरुणाने आपल्यासाठी ओला कॅब बूक केली आणि कॅबची वाट पाहू लागला. तितक्यात त्याच्या फोनवर ओला कंपनीचा एक मेसेज आला. या मेसेजमध्ये कारचा क्रमांक, ड्रायव्हरचे नाव आणि इतर माहिती होती. या तरुणाने कारचा क्रमांक वाचला आणि जेव्हा ड्रायव्हरचे नाव पाहिले तेव्हा त्याचे डोळेच भिरभिरले. त्याने ड्रायव्हरचे नाव वाचल्यावर लगेचच आपली ट्रिप कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला.
या तरुणाने आपल्या मोबाईलवर आलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट काढला आणि इंटरनेटवर शेअर केला. हा स्क्रिनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. timepassstruggler नावाच्या इंस्टाग्राम युजरने हा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं, यमराज आले आहेत आणि नरकात जाण्यासाठी तयार आहेत. ही पोस्ट 17 जून रोजी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली होती.

सोशल मीडियात शेअर करण्यात आलेली ही पोस्ट आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिली आहे. तसेच अनेकांनी त्यावर विविध कमेंट्स सुद्धा केल्या आहेत. अनेक युजर्स ही पोस्ट शेअर सुद्धा करत आहेत. एका युजरने म्हटलं, चेन्नईत माझ्यासोबत सुद्धा अशीच एक घटना घडली होती. दुसऱ्या आणखी एका युजरने म्हटलं, मी सुद्धा एक कॅब बूक केली होती आणि त्या ड्रायव्हरचे नाव यमराज होते. त्याने मला अगदी सुरक्षितपणे मला ज्या ठिकाणी जायचे होते तिथे सोडले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.