Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

IAS पूजा खेडकर यांना मोठा धक्का! प्रशिक्षणाला ब्रेक, मसूरीला परत बोलवलं

IAS पूजा खेडकर यांना मोठा धक्का! प्रशिक्षणाला ब्रेक, मसूरीला परत बोलवलं 


वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले असून त्यांना पुन्हा एकदा मसुरी येथील आयएएस प्रशिक्षण केंद्रात परत बोलावलं आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना आता त्यांचे प्रशिक्षण थांबवून मसुरीला जावं लागणार आहे. आयएएस आधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या वादग्रस्त बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांना कर्तव्यातून मुक्त केले आहे.

महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वादात सापडल्यानंतर उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने महाराष्ट्रातून पूजा खेडकरचा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केला आहे. यासोबतच अकादमीने त्याला तातडीने परत बोलावण्याचे पत्रही जारी केले आहे. पूजा खेडकर यांचे नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र खोटे केल्याच्या आरोपाची चौकशी सुरू आहे. 

पूजा खेडकर या 2023 बॅचच्या अधिकारी 
पूजा खेडकर या 2023-बॅचच्या अधिकारी आहेत. सध्या त्या वाशिम जिल्ह्यात तैनात आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगकडे (UPSC) एकाहून अधिक वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांवरून वाद निर्माण झाला असून ती बनवाट असल्याचा दावा केला जात आहे. या वादादरम्यान दरम्यान मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने त्यांचे प्रशिक्षण स्थगित केले आहे. तसेच त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरीला परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान त्यांच्या आईने हातात पिस्तुल घेऊन एका शेतकऱ्याला धमकावल्याचं प्रकरण देखील समोर आलं होतं. या दरम्यान आता त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. तसेच त्यांना मसुरीला परत बोलवण्यात आले आहे. तिथे त्यांच्या सर्व कागदपत्रांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.
पूजा यांच्याबाबतीत धक्कादायक खुलासे

पूजा खेडकर यांच्या यूपीएससीमधील अनियमिततेबाबत आणखी खुलासे झाले आहेत. यूपीएससीचा प्रयत्न वाढवण्यासाठी पूजा यांनी त्यांचे नाव आणि वय बदलल्याचे समोर आले आहे. 2020 आणि 2023 साठी पूजा यांनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (CAT) मध्ये दाखल केलेल्या दोन अर्जांमध्ये पूजाची वेगवेगळी नावे आहेत. 2020 च्या अर्जात पूजा यांनी त्यांचे नाव 'खेडकर पूजा दिलीपराव' आणि वय 30 वर्षे नमूद केले होते, तर 2023 मध्ये CAT अर्जात त्यांनी त्यांचे नाव 'पूजा मनोरमा दिलीप खेडकर' आणि वय 31 वर्षे नमूद केले होते. तीन वर्षांच्या कालावधीत वय केवळ एका वर्षाने कसे वाढू शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

11 वेळा दिली नागरी सेवा परीक्षा
UPSC मध्ये सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 32 वर्षे वयापर्यंत 6 वेळा परीक्षा देण्याची परवानगी आहे, तर OBC प्रवर्गातील उमेदवार 35 वर्षे वयापर्यंत 9 वेळा परीक्षेला बसू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने एकूण 11 वेळा नागरी सेवा परीक्षा दिली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत (UPSC) निवड होण्यासाठी पूजावर अपंगत्व आणि OBC आरक्षण कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. वाद वाढल्यानंतर त्यांची पुण्याहून वाशीम येथे बदली करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.