Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

IAS पूजा खेडकरांचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात खळबळजनक आरोप; प्रकरणाला वेगळे वळण?

IAS पूजा खेडकरांचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात खळबळजनक आरोप; प्रकरणाला वेगळे वळण?

ट्रेनी आयएएस पूजा खेडकर या आपल्या खासगी गाडीवरील अंबर दिव्यामुळे तसेच महाराष्ट्र शासनच्या पाटीमुळे चर्चेत आल्या. यानंतर खोटे दिव्यांगप्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासंबंधी 2 व्हिडीओ व्हायरल झाले. या सर्वामुळे खेडकर कुटुंबाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या दिसत आहेत. दरम्यान आयएएस पूजा खेडकरांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आरोप केले आहेत.

पूजा खेडकर यांनीही पुण्याच्या जिल्हाधिका-यांविरोधात तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकरांनी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.. यासंदर्भात वाशिम पोलिसांनी पूजा खेडकरांचा जबाब नोंदवल्याचीही माहिती मिळतेय.. 3 महिला अधिका-यांनी पूजा खेडकर यांच्याशी तब्बल 3 तास चर्चा केली.. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या तक्रारीनंतरच पूजा खेडकर यांची प्रशिक्षणासाठी वाशिममध्ये बदली करण्यात आली होती. दिवसेंच्या तक्रारीनंतरच पूजा खेडकरांचं संपूर्ण प्रकरण उजेडात आलं होतं.

महाराष्ट्रातलं प्रशिक्षण स्थगित

पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केलीय. 23 जुलै पूर्वी मसूरी इथल्या अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे पूजा खेडकर यांना आदेश देण्यात आले आहे.

तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग

वाशिम पोलिसांकडे करण्यात आलेली तक्रार ही पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार दाखल केली होती. काल रात्री वाशिम पोलिसांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. तक्रारीच्या कायदेशीर गोष्टीबाबत विचार सुरू वाशिम पोलिसांकडून पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.

केंद्राला पाठवणार अहवाल

पूजा खेडकरचे निवेदन आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे अहवाल गुरुवारपर्यंत सामान्य प्रशासन विभागाला पाठण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य सरकारचे विभागीय आयुक्तांना आदेश अहवाल इंग्रजीत भाषांतर करून पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.यासदंर्भात विभागीय आयुक्त चंद्रकांत पुंडलुकवार गुरुवारपर्यंत अहवाल सादर करणार आहेत.राज्य सरकारच्या पूजा खेडकर कारवाईनंतर सामान्य प्रशासन विभाग केंद्राने नेमलेल्या समितीला अहवाल देणार आहे.

चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून निवड?

आयएएस पदापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा खेडकर यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.या पार्श्वभूमवर पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.