Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रेनी IAS अधिकाऱ्याला किती पगार मिळतो?:, जाणून घ्या, सुविधा काय असतात

ट्रेनी IAS अधिकाऱ्याला किती पगार मिळतो?:, जाणून घ्या, सुविधा काय असतात 


ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. ट्रेनी असतानाही अवाजवी सुविधा मागण्यापासून सुरू झालेलं हे प्रकरण आता त्यांच्या बोगस प्रमाणपत्रांपर्यंत येऊन ठेपलं आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ट्रेनी आयएएस अधिकाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अधिकाऱ्यांना पगार किती असतो? त्यांना काय सुविधा मिळतात? त्यांच्यासाठीचे नियम काय असतात? याची आता चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच टाकलेला हा प्रकाश.

सिव्हिल सर्व्हिस ही भारतातील सर्वात पॉवरफुल नोकरी आहे. त्यामुळेच लोकांची या नोकरीबाबत नेहमी चर्चा असते. सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास करणं बंधनकारक असतं. दोन वर्षाची ही ट्रेनिंग असते. त्यानंतर अधिकाऱ्याची पोस्टिंग केली जाते. या दोन वर्षात शिस्तबद्धता, कठिण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, प्रशासन, नियम आणि कायदे याची माहिती दिली जाते. ट्रेनिंगच्या शेवटच्या फेजमध्ये सर्व ट्रेनिंगचं परीक्षण केलं जातं. या दरम्यान ट्रेनी अधिकाऱ्याच्या राहण्याखाण्याची जबाबदारी संघ लोक सेवा आयोगाची असते.
काय सुविधा मिळते?

पूजा खेडकर प्रकरणानंतर ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधांची चर्चा सुरू झाली आहे. या अधिकाऱ्यांना काय सुविधा मिळतात याचं सर्वांना कुतुहूल वाटत आहे. ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याचा पगार किती असतो, त्यांना काय काय दिलं जातं? अशी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिव्हिल सर्व्हिसची ट्रेनिंग घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांना (आयएएस, आयआरएस, आयएफएस) समान सॅलरी असते. ट्रेनिंगच्या वेगवेगळ्या फेजमध्ये सॅलरी कमी होते आणि वाढते. साधारणपणे ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याचा दरमाह पगार 50 हजार ते 60 हजार रुपये असतो. कधी कधी 70 हजार रुपये पगारही दिला जातो. सर्व डिडक्शन करून त्यांचा पगार त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा केला जातो.

आणखी फायदे काय?
आयएएस ट्रेनिंग दरम्यान या अधिकाऱ्यांना बरंच काही शिकायला मिळतं. फिल्ड एक्सपोजर आणि ट्रॅव्हेलिंगमुळे सिव्हिल सेवेचा खरा अर्थ उमगतो. त्याशिवाय अनेक प्रकारच्या एक्स्ट्रा करिकुलम मॉड्युल्समध्ये त्यांना भाग घेण्याची संधी मिळते. त्यात लीडरशीप, आर्ट ऑफ लिव्हिंग, ट्रेकिंग सारख्या अॅक्टिव्हिटीज असतात. त्याशिवाय संरक्षण मंत्री, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींसारख्या डिग्निटरीजसोबत कॉल ऑनची खास संधीही दिली जाते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.