Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

IAS पूजा खेडकरांचां नवा प्रताप, MBBS प्रवेशासाठी केला होता मोठा झोल?

IAS पूजा खेडकरांचां नवा प्रताप, MBBS प्रवेशासाठी केला होता मोठा झोल?


प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची मालिका संपता संपत नाही आहे. त्यात आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी एमबीबीएसची पदवी मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने ओबीसी कोट्याचा वापर केल्याचा आरोप होत आहे. या आरोपानंतर आता पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेमधून पूजा खेडकर यांनी 2007 साली एमबीबीएस पदवीसाठी प्रवेश घेतला होता. ओबीसी कोट्याचा चुकीचा वापर करून त्यांनी हा प्रवेश घेतल्याचा आरोप होत आहे. ओबीसी भटक्या जमाती-3 कोट्यातून जागा त्यांनी मिळाल्याचा आरोप आहे. खेडकर यांनी या प्रवेशासाठी नॉन-क्रीम लेअर कोट्याचा वापर केला होता. त्यावेळी त्यांचे वडील अधिकारी पदावर कार्यरत होते. पण नवले महाविद्यालयाच्या प्रशासकीय विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी याला भटक्या जमाती-3 वंजारी समाजातील असल्याची पुष्टी दिली आहे. तसेच पूजा खेडकर यांनी प्रवेश घेताना कोणतेही अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले नाही, अशी पुष्टी नवले प्रशासनातील सुत्रांनी दिली आहे. 
पूजा खेडकर यांनी 146/200 गुण मिळवून महाराष्ट्रातील विनाअनुदानित खाजगी महाविद्यालयांमधून प्रवेश मिळवला होता. पूजाला कॉमन सीईटीचा प्रयत्न करायचा होता, पण तिचा स्कोअर त्यापेक्षा जास्त होता. त्यांनी नवले मेडिकल कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये प्रवेश मिळवला होता.पूजा खेडकर यांच्या महाविद्यालयातील नोंदीनुसार तिला दहावीत 83% आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत 74% गुण मिळाले आहेत.. त्यानंतर 2011-2012 बॅचमध्ये त्या एमबीबीएस उत्तीर्ण झाल्या होत्या. 

प्रकरण काय? 
पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकर यांनी अनेक सुविधांची मागणी केली होती. खरं तर या सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. तरीही पूजा खेडकर यांनी लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली तिची वैयक्तिक ऑडी कार वापरली होती, त्यांनी आपल्या वाहनावर 'महाराष्ट्र सरकार' असा फलक लावला आणि अधिकृत गाडी, निवास, कार्यालय कक्ष आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. इतकचं नाही तर त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरवरही ताबा मिळवला होता.  या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.