Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा विध्यार्थीनां आता EWS मधून अर्ज करता येणार नाही! आयोगाने काढले नोटिफिकेशन, वकील सदावर्तेचां दावा

मराठा विध्यार्थीनां आता EWS मधून अर्ज करता येणार नाही! आयोगाने काढले नोटिफिकेशन, वकील सदावर्तेचां दावा 

राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. पण याला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने विरोध केला आहे.

अशात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दावा केला आहे की, "मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये आर्थिक दुर्बल घटकातून म्हणजेच EWS मधून अर्ज करता येणार नाही असे नोटीफिकेशन लोकसेवा आयोगाने काढले आहे."

दरम्यान सदावर्ते यांचा हा दावा खरा असेल तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.


मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती. त्याची सुनावनी नुकतीच पार पडली. यामध्ये सदावर्ते यांनी, "मराठा समाजाला तीन तीन प्रकारचे आरक्षण आहेत, त्यामुळे एक समाज तीन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही असे म्हटले आहे.

काय आहे सदावर्तेंचा युक्तीवाद?

राज्यात मराठा समाज राज्य सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि EWS लाभ घेत आहे. त्यामुळे एकाच समाजाला तीन आरक्षणांचा लाभ कसा घेतो? असा सवाल सदावर्तेंंनी न्यायालयात उपस्थित केला होता. तेव्हा न्यायालयाने त्यांचा युक्तीवाद मान्य करत नव्यानं रीट याचिका दाखल करण्यास परवानगी दिली होती.

दरम्यान गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाचा लढा सुरू आहे. दरम्यान जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारने 13 जुलै पर्यंतची मुदत मागितली होती. ती मुदत आता संपल्या आहे. त्यामुळे जरांगे पाटील कोणते पाऊल उचलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.