Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुबईच्या राजकन्येनें Estagram वरून दिला तलाक, तलाक, तलाक, दोन महिन्यापूर्वीच झालीय आई

दुबईच्या राजकन्येनें Estagram वरून दिला तलाक, तलाक, तलाक, दोन महिन्यापूर्वीच झालीय आई 


मुस्लिम धर्मात तीन तलाक ही पद्धत रुढ आहे. तीन वेळा तलाक-तलाक-तलाक असं म्हणून पतीपत्नी एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात. नुकताच दुबईच्या राजाच्या मुलीने अशाच पद्धतीने आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला आहे.
विशेष म्हणजे तिने इन्स्टाग्रामवर 'तलाक तलाक तलाक' म्हणत नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. दुबईच्या राजाची मुलगी शेख माहिरा बिंत मोहम्मद बिल राशिद अल मखतूम हिने आपल्या नवऱ्याला चक्क इन्स्टाग्रामवरुन घटस्फोट दिला आहे.
दुबईच्या राजकन्येने एका खळबळजनक पोस्टमधून नवऱ्याला घटस्फोट दिला आहे. 'मी तुम्हाला तलाक देत आहे' असं तीन वेळा लिहून तिने या घटस्फोटाची घोषणा केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच तिने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर लगेचच तिने या तलाकची घोषणा केली आहे. शेख माहिरा हिने उद्योगपती शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद अल मखतूम याच्याशी गेल्या वर्षी लग्न केलं होतं. 
त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर लगेच घटस्फोटाची घोषणा करुन तिने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. शेख माहिरा ही स्वतःही एक यशस्वी उद्योगपती आहे. ती सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव आहे. मुस्लिम जगतातील चर्चेत असलेल्या आणि ॲक्टिव असलेल्या खूप मोजक्याच महिला नेत्यांपैकी ती एक आहे. इन्स्टाग्रामवर तिने लिहिलंय, 'तुम्ही इतर जोडीदारांबरोबर व्यस्त असल्यामुळे मी तुम्हाला तलाक देते. तलाक देते. तलाक देते. काळजी घ्या.' शेख माहिराने इन्स्टाग्रामवरुन नवऱ्याबरोबरचे सगळे फोटोही डिलीट केले आहेत. तिने 'इतर जोडीदारांबरोबर' असं लिहिल्यामुळे तिच्या विधानाचा 'इतर पत्नींबरोबर' असा अर्थ लावला जात आहे.

शेख माहिराने मे महिन्यात काही फोटो शेअर केले होते. त्यात तिने आपल्याला मुलगी झाल्याची आनंदवार्ता सांगितली होती. त्या पोस्टमधून तिने आपले डॉक्टर आणि रुग्णालय यांचे आभार मानले होते. तिने आपल्या मुलीला कुशीत घेतलं होतं आणि तिचे पतीही त्या फोटोत दिसत होते. मात्र, आता तो फोटो शेख माहिराने डिलीट केला आहे. लग्नानंतर पाच महिन्यांनी तिने आपण प्रेग्नंट असल्याची बातमीही इन्स्टाग्रामवर दिली होती. 'आम्ही आता तिघे होणार' असं तिने त्यावेळी म्हटलं होतं.
शेख माहिराचे वडिल शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतूम हे दुबईचे राजे आहेत. ते यूएईचे संरक्षणमंत्रीही आहेत. शेख माहिरा ही त्यांच्या 26 अपत्यांपैकी एक आहे. तिची आई जोए ग्रिगोरोकस ही ग्रीसची रहिवासी होती. शेख माहिराचे आईवडिलही आता विभक्त झाले आहेत. शेख माहिरा आणि तिची आई यांचं नातं अत्यंत घनिष्ट आहे. ती अनेकदा आईबरोबर फोटो शेअर करत असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.