Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

BMC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णंसंधी :, 20 ते 40 हजार रुपये पगार मिळणार!

BMC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णंसंधी :, 20 ते 40 हजार रुपये पगार मिळणार!


बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) इ सी जी तंत्रज्ञ या पदासाठी 2 जागा, तंत्रज्ञ या पदासाठी 2 जागा, औषध निर्माता या पदासाठी 5 जागा, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ या पदासाठी 2 जागा, समाज विकास अधिकारी या पदासाठी 4 जागा आहेत. अशा एकूण 15 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावक विभागात सादर करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार,

इ सी जी तंत्रज्ञ- उमेदवार बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत चालविला जाणारा कार्ड टेक्नॉलॉजी विषयातील बी पी एम टी हा पूर्ण वेळ साडेतीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा किंवा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेची पद्धत विज्ञान पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा इ सी जी मधील कामाचा सहा महिन्याचा अनुभव असावा.

तंत्रज्ञ- उमेदवार हा संबंधित विषयात मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीध धारण केलेला असावा.
औषध निर्माता- उमेदवाराकडे राज्य शासनाचा तंत्रशिक्षण मंडळाचे फार्मसी मधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे फार्मसी मधील पदवी असणे आवश्यक उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल कडे नोंदणी करत असावा.
कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ- उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा बीएससी ओटी पदवीधारक असावा तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिक उपचार परिषद मुंबई येथे नोंदणीकृत असावा.
समाज विकास अधिकारी- उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा समाजकार्यातील एम एस डब्ल्यू किंवा एम ए एस डब्ल्यू विषयात पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवीधारक असावा तसेच उमेदवाराला एक वर्ष सेवेचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. 20 ते 40 हजार रूपये पगार मिळणार.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 838 एवढे शुल्क आकारले जात असून हे शुल्क लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या रोखपाल विभागात कार्यालयीन वेळेत भरायचे आहे.

अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.