Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेड खाण्यापूर्वी 'हे ' वाचाच, तुम्हीपण 'ही ' चूक करत तर नाहीना?

ब्रेड खाण्यापूर्वी 'हे ' वाचाच, तुम्हीपण 'ही ' चूक करत तर नाहीना?


अनेक जणांना सकाळी नाश्त्याला ब्रेड लागतोच. मग ते चहा असो वा अंड्याची पोळी, ब्रेडची सोबत असलीच पाहिजे. अनेकांना सकाळसकाळी ब्रेडवर बटर किंवा चॉकलेट स्प्रेड लावून खाण्याची सवय असते. ब्रेडमध्ये मैदा असल्याने तर निश्चितच याचे अतिसेवन आरोग्याला चांगले नाही. ब्रेडमध्ये अशा काही गोष्टी असतात जे आपण मर्यादेत तरी खाल्ले तरी आपल्याला अनेक विकार देऊ शकतात. यामुळे अशा काही गोष्टी आहेत जे आपण ब्रेड खरेदी करण्या पूर्वी तपासल्या पाहिजेत. जर आपण या गोष्टी तपासून ब्रेड खरेदी केले तर आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यात आणखीन एखादा पाऊल उचलू शकतो.

सर्वप्रथम आपण जो ब्रेड खरेदी करतो त्याची क्वालिटी तपासणे महत्वाचे असते. लॉ क्वालिटीचे ब्रेड आपल्या आरोग्याशी नक्कीच खेळ खेळते. बाजारात ब्राउन ब्रेड, गव्हाचे ब्रेड, मिक्स ग्रेन ब्रेड असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड मिळत असतात. पण तुम्ही खरेदी करणारा गव्हाचा ब्रेड नक्कीच गव्हापासून बनला आहे का? याची नोंद असणे फार गरजेचे आहे, कारण बाजारात ड्युप्लिकेट हा प्रकार वाढला आहे. आता, एका ड्युप्लिकेट पदार्थावर कितपत विश्वास ठेवणे योग्य आहे. हे तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल. ब्रेडच्या पॅकिंगवर अशा अनेक गोष्टी लिहलेल्या असतात जे न तपासुन आपण मोठी चूक करतो. सर्वप्रथम, ते तपासायला सुरवात करा.
साखरेचे अतिसेवन नक्कीच आरोग्याला इजा पोहचवते तसेच अनेक विकारांना आमंत्रित करते. ब्रेडमध्ये यीस्ट ऍक्टिव्ह करण्यासाठी साखरेची गरज लागते. खासकरून, फॅक्ट्रीमध्ये ब्रेडची नमी टिकवून ठेवण्यासाठी एक्सट्रा साखर, मध किंवा उसाचा रस टाकला जातो. म्हणून ब्रेड खरेदी करण्यापूर्वी त्यात एक्सट्रा साखर वापरली गेली आहे का? हे तपासून घ्या.

जसा साखरेचा अतिसेवन आरोग्याला हानीकार आहे तसाच जास्त मीठही मानवी आरोग्याला इजा करतो. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, ब्रेडच्या एका स्लाइसमध्ये 100-200 मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम नसावे. तर ब्रेड खरेदी करण्यापूर्वी लेबल तपासून पाहावे. सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास नक्कीच ब्रेड टाळावा. ब्रेडच्या पॅकेजिंगवर बेस्ट बिफोर डेट दिली जाते. हि तारीख त्या ब्रेडची एक्सपायरी डेट असते. या तारखेनंतर ब्रेडची सोडायला सुरुवात होते. त्यामुळे तारीख बघूनच ब्रेड खरेदी करा.
फायबर ब्रेडमधील सगळ्यात लोकप्रिय घटक आहे. पण प्रक्रियेवेळी, फायबरचे प्रमाण घटते. त्यामुळे फायबरचे प्रमाण तपासणे आवश्यक आहे. तसेच ब्रेडची ताजगी वाढवण्याची प्रिजर्वेटिव आणि एडिटिव्स वापरला जातो, जे आरोग्यास हानिकारक असतात. शक्यतो याचे प्रमाण कमी किंवा नसेलेलेच ब्रेड खा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.