Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? वाचा, मळ झाला तर काय करायच....

कानात मळ झाला म्हणून कान कोरता? वाचा, मळ झाला तर काय करायच...


कानात मळ साचणे ही एक खूप कॉमन समस्या आहे . कानात मळ साचल्यानंतर आपण विविध उपाय करून मळ काढतो. कधी कधी वेळेवर मळ नाही काढल्यास, कानात इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे कानाला इजा होऊ शकते. कानात मळ साचण्याची अनेक कारणं असू शकतात. पण वेळेत मळ काढणे गरजेचं आहे.

इअरवॅक्स काढण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो. पण इअरवॅक्स काढताना कानाच्या पडद्याला काही दुखापत तर होणार नाही ना, याची भीती मनात सतावत असते. इअरवॅक्स काढताना जर कानात वेदना जाणवत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा 

इअरवॅक्स म्हणजे काय?
इअरवॅक्स हा मेणासारखा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या कानात असतो. इअरवॅक्स कानाच्या आतील त्वचेचे संरक्षण करण्यासाठी आणि जंतूंपासून संरक्षण करतात. वैद्यकीय भाषेत इअरवॅक्सला 'सेरुमेन' म्हणतात. यामुळे कानाच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि बॅक्टेरियाजच्या वाढीस प्रतिबंध होतो. कारण बॅक्टेरियांची वाढ रोखणारे घटक त्यात असतात.
कान स्वच्छ करताना कोणती खबरदारी घ्यावी?

डॉ. विनोद शर्मा सांगतात कान स्वच्छ करताना अनेक जण माचिसच्या काड्या, तेल किंवा लसणाच्या तेलाचा वापर करतात. यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. ज्यामुळे कानाच्या इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कानात या गोष्टी घालणे टाळा.

इअरवॅक्स काढण्यासाठी कोमट पाण्याचा उपाय
कानातील मेण स्वच्छ करण्यासाठी आपण कोमट पाण्याचा सोपा उपाय करून पाहू शकता. कोमट पाणी कानातील मळ काढण्यास फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाणी हलकं गरम करून घ्या. त्यानंतर ड्रॉपरच्या मदतीने कानात २-३ थेंब पाणी घाला. आपण त्यात मीठ देखील घालू शकता. नंतर कॉटन बॉलच्या मदतीने इअरवॅक्स काढा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.