Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- प्रेयसीसोबत सेल्फी घेतांना अचानक पाणी पातळी वाढली अन, त्याचा पाय घसरला...

सांगली :- प्रेयसीसोबत सेल्फी घेतांना अचानक पाणी पातळी वाढली अन, त्याचा पाय घसरला...


सांगलीतील कृष्णा नदीमध्ये प्रेयसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना घडली. प्रियकर आणि प्रेयसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले. 

यावेळी प्रेयसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली. परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता. पाणी पातळी वाढल्याने संबंधित तरुण देखील काठावर येऊ लागला तितक्‍यात बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागल्याने त्याचा पाय घसरल्याने तो कृष्णा नदीत बुडाला. 

घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले असून, बुडालेल्या तरुणाचा सध्या शोध सुरू आहे. सांगलीत गेल्या चार दिवसात ही दुसरी घटना आहे. मासेमारीसाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा कृष्णा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला होता. आता सेल्फी काढत असताना तरुण बुडाण्याची ही दुसरी घटना घडली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.