Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! पतीचे हातपाय बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार :, अमरावती हदरलं

धक्कादायक! पतीचे हातपाय बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार :, अमरावती हदरलं 


अमरावती : पतीचे हातपाय बांधून पत्नीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 19) उघडकीस आली. पीडित 60 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी आरोपी अब्दुल नईम ऊर्फ नम्मू अब्दुल अली (31, रा. मच्छीसाथ, करजगाव) व प्रकाश पानसे (25, रा. भालेवाडी, करजगाव ता. चांदूर) या दोन आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

60 वर्षीय महिला आपल्या झोपडीत असताना अब्दुल नईम व प्रकाश पानसे हे दोघेही तेथे गेले आणि त्यांनी महिलेचा हात पकडून तिला जबरदस्तीने बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरात उपस्थित असलेल्या पतीने कोठे घेऊन जात आहे, असे त्यांना विचारले. त्यावेळी प्रकाशने महिलेच्या पतीचे हातपाय लुगड्याने बांधले आणि त्याला पलंगाला बांधून ठेवले. त्यानंतर दोघांनीही महिलेला बाहेर ओढत नेले, त्यावेळी महिलेने आरडाओरड केला.
महिला झाली बेशुध्द

दोन्ही नराधमांचा लैंगिक अत्याचार पाहून पीडित महिला बेशुध्द पडली. ती रात्रीच्या वेळेत शुध्दीवर आली. त्यानंतर महिलेने आपली घरी जाऊन पतीचे हातपाय सोडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिरजगाव कसबा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला शासकीय रुग्णालयात नेले आणि तेथे महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

महिलेला अंधारात नेऊन…
दोघांनीही महिलेला एका झाडाजवळील अंधारात नेले. महिलेने दोघांचाही प्रचंड विरोध केला. परंतु, त्यांनी महिलेला थापड व बुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोघांनीही महिलेवर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.