Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जपानी लोक का जगतात जास्त आयुष्य? भारतातील नागरिकांना 'ही ' माहिती असायला हवी

जपानी लोक का जगतात जास्त आयुष्य? भारतातील नागरिकांना 'ही ' माहिती असायला हवी 


सध्याच्या काळात मानवाचं सरासरी आयुर्मान कमी होत असल्याचं दिसत आहे. अनेक व्यक्ती वयाची साठीदेखील ओलांडू शकत नाहीत. त्यापूर्वीच त्यांना विविध आजार होतात आणि काहींचा मृत्यू होतो; पण जपानमधले नागरिक आजही 100 वर्षांपर्यंत जगतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जपानमधल्या नागरिकांचं सरासरी आयुर्मान जगात सर्वाधिक आहे. तिथले नागरिक सरासरी 84 वर्षांपेक्षा जास्त जगतात. एका संशोधनामध्ये जगातल्या अनेक देशांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात जपानमधल्या नागरिकांचा आहार पूर्णपणे वेगळा असल्याचं निदर्शनास आलं.

जपानमध्ये कॅन्सर, हार्ट डिसीजेस आणि डायबेटीसचे रुग्ण कमी आहेत. एका संशोधनानुसार, जपानमधले पुरुष आणि महिलांमध्ये धूम्रपान आणि तंबाखू सेवनाचं प्रमाणदेखील खूपच कमी आहे. तिथल्या नागरिकांना हाय ब्लडप्रेशरचा धोकाही कमी असतो. हे सगळं त्यांच्या आहारामुळे घडत असल्याचं दिसून आलं आहे.

रेड मीट, दूध व डेअरी प्रॉडक्ट्सचं कमी सेवन : जपानमध्ये रेड मीट, दूध आणि डेअरी प्रॉडक्ट्सचा अतिशय कमी प्रमाणात वापर होतो, असं संशोधनात दिसून आलं आहे. परिणामी तिथल्या नागरिकांच्या शरीरात सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड कमी प्रमाणात जातात. सॅच्युरेटेड फॅट हा घटक हार्ट डिसीजेस, मेंदूचे आजार, हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका वाढवतो.

शुगर आणि स्टार्च फूड : जपानी नागरिक साखर, गोड पदार्थ, फळं आणि बटाटे कमी खातात. या पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर आणि स्टार्चचं प्रमाण जास्त असतं. ज्यांचं शरीर ग्लुकोज नीट पचवू शकत नाही अशा व्यक्तींचं आयुष्य या पदार्थांमुळे कमी होतं. हे पदार्थ न खाल्ल्याने डायबेटीससारखे आजार असलेल्या व्यक्तीदेखील निरोगी जीवन जगू शकतात.

मासे आणि सीफूडचं जास्त सेवन : जपानी नागरिकांच्या आहारात सीफूड आणि मासे मोठ्या प्रमाणात असतात. यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असतात आणि ती अतिशय आरोग्यदायी असतात. त्यातून ओमेगा फॅटी अॅसिड आणि प्रोटिन्सदेखील मिळतात. हेल्दी फॅट्सचं सेवन केल्याने हृदय आणि मेंदूच्या आजाराने मृत्यू होण्याचा धोका कमी होतो.

सोयाबीनचा वापर : आशियामध्ये सोयाबीनचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जपानी नागरिकही मोठ्या प्रमाणात सोयाबीन खातात. व्हेजिटेरिअन प्लँट बेस्ड प्रोटीनचा स्रोत असलेल्या सोयाबीनमध्ये आयसोफ्लाव्होन असतात. हे अँटी-कॅन्सर आणि अँटी-कार्डिओव्हस्क्युलर आहेत. यामुळे व्यक्ती प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, हार्ट अॅटॅकसारख्या धोकादायक परिस्थितींपासून स्वतःचं संरक्षण करू शकते. यासोबतच जपानमध्ये इतर देशांच्या तुलनेत तांदूळदेखील जास्त खाल्ले जातात.

विशिष्ट प्रकारचा चहा : जपानी व्यक्ती भरपूर चहा पितात; पण तो ग्रीन टी असतो. त्यात साखर नसते. साखरेचं सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो आणि ब्रेस्ट कॅन्सर व इस्केमिक हार्ट डिसिजने मृत्यू होण्याचा धोका वाढतो. साखर हा शरीराचा सर्वांत मोठा शत्रू मानला जातो. ग्रीन टीची पानं हे अँटी-एजिंग फूड मानलं जातं.

एनर्जी आणि फिजिकल अॅक्टिव्हिटी : जपानी नागरिकांच्या आहारात कार्ब्जचं प्रमाण कमी झालं आहे. यामागे एक विशेष कारण आहे. पूर्वी जपानी व्यक्तींची शारीरिक हालचाल जास्त होती. त्यामुळे कार्बोहायड्रेट्सचं सेवन जास्त होतं. हा घटक शरीराला ऊर्जा पुरवतो; पण आता शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाणही कमी झालं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.