Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इवल्याश्या बिया लय कामाच्या, रोज सकाळी कोमट पाण्यात घालून प्या

इवल्याश्या बिया लय कामाच्या, रोज सकाळी कोमट पाण्यात घालून प्या

आजकालच्या बैठी जीवनशैलीमुळे माणसांचे वजन आणि पोट दोन्हीही सुटत चालले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेला लठ्ठपणा वेळीच रोखण्यासाठी अनेकजण विविध व्यायामाला प्राधान्य देतात. पण असेही काही लोकं आहेत ज्यांना पोटाची चरबी तर कमी करायची आहे, पण व्यायामालाही त्यांना वेळ देता येत नाही. तुम्ही देखील अशाच लोकांच्या लिस्टमध्ये मोडता का? असे असेल तर काही चिंता करण्याची गरज नाही, कारण तुमचा लठ्ठपणा कमी करण्याची ताकद एका चमचाभर बियांमध्ये आहे. तुम्हाला फक्त रोज सकाळी कोमट पाण्यात या बिया घालून प्यावे लागेल, काही आठवड्यांतच तुम्हाला तुमच्यात बदल दिसून येईल.

अनियंत्रित वाढत चाललेले वजन व्यायामाशिवाय आटोक्यात आणण्यासाठी तुम्ही काही बियांची मदत घेऊ शकता. या बियांच्या सेवनानं लठ्ठपणा सहज कमी करता येतो. त्या बियांना चिया सिड्स असं म्हणतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी या बियांच्या पाण्याचे सेवन केल्याने तुमच्या पोटावरची आणि एकंदरीत शरीराची चरबी झरझर उतरण्यास मदत होईल. केवळ वजनच नाही तर चिया सिड्सच्या सेवनाने हाडं देखील मजबूत राखण्यास मदत होते. फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, ओमेगा-3, फॅटी एसिड्स, फॉस्फरस आणि एँटी ऑक्सि़ेंट्सने युक्त या बियांबद्दल सविस्तर जाणून घ्या.

वजन कमी करण्यासाठी चिया सिड्स फायदेशीर

चिया सिड्समध्ये फायबर्स आणि प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. या बिया जेव्हा पाण्यात भिजवल्या जातात तेव्हा त्या फुगतात, पाण्यात त्यांची जेलसारखी संरचना तयार होते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. या कारणामुळे लोकांना जास्त भूक लागत नाही. परिणामी अनावश्यक वजन वाढ टळते.

चिया सिड्स खाण्याची योग्य पद्धत

वजन कमी करण्यासाठी रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा चिया सिड्स भिजवून ठेवा. सकाळच् यावेळी पाणी हलकं गरम करून याचे सेवन करा. नियमित याचे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

चिया सिड्सचे इतर फायदे

चिया सिड्समध्ये आयर्न, व्हिटामीन सी यांसारखे गुण असतात. ज्यामुळे लठ्ठपणा वेगाने कमी होण्यास मदत तर होतेच पण त्याबरोबरच इतर फायदे देखील होतात. जसे की-

रक्तातील साखर नियंत्रणात येते

काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की चिया सिड्समध्ये असलेले फायबर इंसुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे मेटाबॉलिक सिंड्रोम आणि टाइप-2 मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

हाडे मजबूत होतात

हाडे मजबूत करण्यासाठी शरीरात कॅल्शियमचे पुरेसे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे. कॅल्शियमसोबतच, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. हाडे निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक किंवा दोन चमचे चिया सिड्स खाणे पुरेसे आहे.

हृदयासाठी फायदेशीर

चिया सिड्समध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (ALA) आणि क्वेर्सेटिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, जे हृदयरोगांपासून संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ते हृदयाची कार्यक्षमता देखील वाढवतात आणि हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवतात.

वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात

चिया सिड्स त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन एफ त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेचा पोत सुधारतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या यांसारख्या वृद्धत्वाची लक्षणे कमी दिसतात.

सूज दूर करण्यास उपयुक्त

शरीरात दीर्घकाळ सूज येण्याच्या समस्येमुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. चिया सिड्समध्ये कॅफीक ऍसिड नावाचे अँटीऑक्सिडंट आढळते जे जळजळ कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीवर आधारित आहे. सांगली दर्पण असा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे आहारात कुठलाही बदल करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.