Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा…अनोख्या जॉब ऑफरमुळे पोलीस हादरले

प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा…अनोख्या जॉब ऑफरमुळे पोलीस हादरले 


जॉबच्या ऑफरच्या शोधात अनेक युवक असतात. मग जॉब शोधणाऱ्या युवकांना टार्गेट करणारे अनेक एजंट अस्तित्वात असतात. सोशल मीडियावर या तरुणांना भुरळ घालणाऱ्या जाहिराती दिल्या जातात. सोशल मीडियावर जॉबची वेगळीच ऑफर आली.

त्यात म्हटले होते की, महिलेस प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा…एका अशा महिलेस गर्भवती करायचे आहे, ज्या महिलेस मूल होत नाही. जर त्या महिलेस गर्भवती केले तर लाखो रुपये मिळणार आहे. हरियाणामधील हे प्रकरण पाहून पोलिसांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

नेमका प्रकार काय
हरियाणामधील नूंह जिल्ह्यातील सोशल मीडियावरील जाहिराताचा प्रकार समोर आला आहे. त्यानुसार, महिलांना गर्भवती करण्यासाठी पैसे देणारी जाहिरात सोशल मीडियावर करण्यात आली. ही जाहिरात पाहून पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यानंतर या प्रकरणात फसवणूक करणारी साखळीच उघड झाली. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
दोन आरोपींना अटक

पोलिसांनी सांगितले की, महिलांना गर्भवती करण्याच्या बदल्यात पैसे देण्याची फेक जाहिरात व्हायरल झाली. निसंतान महिलांना ‘प्रेग्नेंट’ करण्याची ही जाहिरात आहे. फसवणारी ही टोळी महिलांचे फेक फोटो वापरत होते. या माध्यमातून युवकांची फसवणूक केली जात होती. या प्रकरणात एजाज आणि इरशाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नोंदणी शुल्क घेऊन फसवणूक
जाहिरात पाहिल्यानंतर कोणी त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांच्याकडून नोंदणी शुल्क घेतले जात होते. त्यानंतर त्यांना ब्लॉक केले जात होते. तपासादरम्यान चारहून अधिक बनावट फेसबुक खाती आणि बनावट जाहिराती आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातीपासून सावध राहण्याचा आवाहन पोलिसांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.