Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरोदर पत्नीच्या चितेची राख उचलायला गेला पती :, हातात आलं असं काही सर्वच हादरले

गरोदर पत्नीच्या चितेची राख उचलायला गेला पती :, हातात आलं असं काही सर्वच हादरले 


लखनऊ : अंत्यसंस्कार होत असताना काही नाही काही विचित्र घडल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे सर्वांना धक्का बसला आहे. एका प्रेग्नंट महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर तिचा पती चितेची राख उचलायला गेला. तेव्हा त्याच्या हातात अचानक असं काही लागलं की ते पाहून त्याच्यासह सर्वजण हादरले. उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे.

मेरठच्या राठोरा खुर्द गावातील नवनीत कौर, प्रसूतीसाठी मवाना शहरातील जेके रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. तिचा पती चितेची राख गोळा करत होतात. त्यावेळी त्याच्या हातात असं काही आलं की त्याने विचारही केला नव्हता.

व्यक्तीने केली तक्रार
हे पाहिल्यानंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. कुटुंबीय सीएमओ कार्यालयात गेलं. यानंतर मेरठच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाचा परवाना निलंबित केला आहे. याशिवाय या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समितीही स्थापन करण्यात आली आहे.
चितेच्या राखेत काय होतं?

त्या राखेत सर्जिकल ब्लेड होतं. महिलेच्या ऑपरेशनदरम्यान हे ब्लेड डॉक्टरांनी तिच्या पोटातच सोडलं, त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. डॉक्टरांचा इतका निष्काळजीपणा असेल याचा विचारही केला नव्हता, असं कुटुंबीयांनी सांगितलं. कआता त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

प्रेग्नंट महिलेच्या पोटात टॉवेल
2020 साली ही धक्कादायक घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्याती शगुफ्ता अंजुम नावाची महिला, 5 जून 2020 रोजी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं. मात्र बाळ झाल्यानंतर 4 महिन्यांनी तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि सातत्याने उलट्याही होत होत्या.

त्यानंतर तिला पुन्हा त्याच रुग्णालयात नेण्यात आलं, जिथं तिची प्रसूती झाली. सीएमएस डॉ. सुषमा कर्णवाल यांनी तिची प्रसूती केली होती. त्यांनी तिची तपासणी करून काही गोळ्या दिला आणि काही दिवसांत आराम मिळेल असं सांगितलं. मात्र त्या औषधांचा काही परिणाम झाला नाही. तिचं अल्ट्रासाऊंट, सिटी स्कॅनही करून पाहिलं मात्र काहीच समजत नव्हतं असं मोहम्मद फैजान म्हणाले.

अखेर त्यांनी आपल्या पत्नीला लखीमपूरमधील रुग्णालयात नेलं. तिथं डॉ. जेड खान यांना दाखवलं. त्यांनी तिचं एमआरआय केलं. त्यावेळी तिच्या पोटात एक वस्तू असल्याचं समजलं आणि डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं.

ऑपरेशननंतर तिच्या पोटातून टॉवेल निघाला. टॉवेल पोटात राहिल्यानं पोटात संक्रमण पसरलं होतं. तिची एक आतडी खराब झाली होती, जी कापावी लागली. कारण संक्रमणामुळे तिच्या जीवाला धोका होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. आतडी कापून डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.