Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नॉन - स्मोकर्समध्ये वाढल कॅन्सरचं प्रमाण :, संशोधनातून मोठं कारण आलं समोर

नॉन - स्मोकर्समध्ये वाढल कॅन्सरचं प्रमाण :, संशोधनातून मोठं कारण आलं समोर 


फुप्फुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतात आनेक तरुण मुलं आणि मुली देखील फुप्फुसांच्या कॅन्सरचे शिकारी बनतायत. अशात चकित करणारी गोष्ट म्हणजे फुप्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण स्मोकर्सपेक्षा नॉन स्मोकर्समध्ये जास्त आहे.
'लॅन्सेट' या जर्नलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. कॅन्समध्ये फुप्फुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे. यामध्ये एक धक्कादायक आकडेवारी देखील देण्यात आली आहे. साल २०२२ मध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरने तब्बल २२ लाखांहून अधिक व्यक्ती पीडित होते. तर त्याच वर्षी तब्बल १८ लाख रुग्णांचा याने मृत्यू झाला होता. कॅन्सरने मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरने मृत्यू झालेल्यांचं प्रमाण जास्त होतं.
नॉन-स्मोकर्स व्यक्तींना होतोय फुप्फुसांचा कॅन्सर

आश्चर्यकारक बाब म्हणजे फुप्फुसांच्या कॅन्सरमध्ये अशी प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत ज्यामध्ये त्या व्यक्तींनी कधीच सिगरेट प्यायलेली नाही. मात्र तरीही त्यांना हा कॅन्सर होऊन त्यांचा जीव देखील गेला आहे. समोर आलेल्या अभ्यासानुसार भारतातील 40 ते 50 टक्के फुफ्फुसाच्या रुग्णांमधील रुग्ण नॉन-स्मोरर्स आहेत.

धूम्रपान न करता कॅन्सर का होतोय?
भारतात अनेक व्यक्ती धूम्रपान करतात. धूम्रपान केल्याने आपल्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम सुद्धा होतात. मात्र ज्या व्यक्ती धूम्रपान करत असलेल्या व्यक्तीच्या सानिध्यात किंवा आजुबाजूला असतात त्यांना देखील कॅन्सर होतो.

वाहनांचा दूर, धूम्रपानाचा धूर, कारखान्यातील वायू हवेत मिसळले जातात. त्यामुळे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांच्या हृदयावर लगेचच याचा परिणाम होतो. आजाराकडे वेळीच न दिल्याने त्या व्यक्तीस भविष्यात हृदयाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.