Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या करता का? जाणून घ्या नुकसान

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या करता का? जाणून घ्या नुकसान 


चपाती ही आपल्या भारतीय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा असा पदार्थ आहे. प्रत्येक भारतातील घरामध्ये चपाती ही केली जाते, चपातीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. परंतु चपाती करताना त्याआधी पीठ मळणे. हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. सकाळी ऑफिसची त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेची गडबड असल्याने अनेक महिला या रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात. आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्या चपात्या बनवतात. परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहेत. त्याने आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?हे आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही जर रात्री फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या सकाळी करत असाल, तर त्याचा आपल्या पचनसंस्थेवर खूप परिणाम होतो. तुम्ही जर वारंवार हेच करत असाल, तर त्यामुळे तुम्हाला गॅस, एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या वारंवार उद्भवतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही मळलेले पीठ जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवले, तर त्याला बुरशी येऊ शकते. आणि अशा पीठामुळे आपल्याला अनेक आजार देखील होऊ शकतात.

चपातीचे पीठ मळून जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले, तर त्यावर बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता असते. अशा पिठापासून जर तुम्ही चपात्या बनवल्या, तर त्याची चव देखील बदलते. आणि रंग देखील बदलतो त्यामुळे हे पीठ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

त्याचप्रमाणे रात्री मळलेल्या पिठाच्या जर तुम्ही सकाळी चपट्या बनवत असाल, तर त्यातील पोषकतत्व कमी होतात. ज्याचा आपल्या शरीराला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे जास्त वेळ पीठ म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवू नका. किंवा त्याच्या नंतर चपात्या देखील करून खाऊ नका. आणि त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.