Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तब्बल तीन वर्षानी मिरजेचे वॉनलेस हॉस्पिटल होणार सुरू!डॉ. रियाज मुजावर यांच्या पुढाकाराने रविवारी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

तब्बल तीन वर्षानी मिरजेचे वॉनलेस हॉस्पिटल होणार सुरू! डॉ. रियाज मुजावर यांच्या पुढाकाराने रविवारी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन


सांगली :  मिरजेचे प्रसिद्ध असे वॉनलेस हॉस्पिटल (मिशन हॉस्पिटल) तब्बल तीन वर्षानी पुन्हा सुरू होत आहे. नागरिकांकडून याचे स्वागत केले जात असून प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांच्या पुढाकाराने रविवार दि. १४ जुलै रोजी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी शिबिर तसेच ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गोरगरीब रूग्णांचा आधार म्हणून एकेकाळी नावलौकिक मिळवलेले हे हॉस्पिटल पुन्हा सुरू होत असल्याने दक्षिण महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून याचे स्वागत केले जात आहे. 
 
मिरजेचे प्रसिद्ध वॉनलेस हॉस्पिटल (मिशन हॅस्पिटल) गेल्या तीन वर्षापासून काही कारणास्तव बंद होते. येथील रूग्णसेवा बंद झाल्याने गोरगरीब रूग्णांना महागड्या हॉस्पिटलशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता पुन्हा हे हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेत कार्यरत होत आहे. मिरजेतील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्टकेअर आणि वॉनलेस हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४ जुलै रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर तसेच ईसीजी, इकोकार्डियोग्राफी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते दुपारी अडीचच्या दरम्यान हे शिबिर होणार आहे. 

या शिबिरासाठी सांगली आणि मिरजेतील अनेक सेवाभावी, वैद्यकीय क्षेत्रातील संस्था, मेडिकल असोसिएशन, औषध विक्रेता संघटनांचे सहकार्य लाभले आहे. एकंदरीत या शिबिरापासून मिरजेचे ऐतिहासिक वॉनलेस हॉस्पिटल पुन्हा सुरू होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.