Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन इंजेक्शन अन् एचआयव्हीपासून पूर्ण संरक्षण; दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये चाचणी यशस्वी

दोन इंजेक्शन अन् एचआयव्हीपासून पूर्ण संरक्षण; दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये चाचणी यशस्वी

न्यूयॉर्क : एचआयव्ही होणे म्हणजे आयुष्याचा शेवट झाल्यासारखे अनेक रुग्णांना वाटते. मात्र आता एका चाचणीनंतर नवी आशा निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि युगांडामध्ये नवीन अँटिव्हायरल औषधाचे वर्षातून दोन वेळा इंजेक्शन घेतल्याने महिलांमधील एचआयव्ही पूर्णपणे बरा झाल्याचे समोर आले आहे.

'लेनकापावीर' असे या औषधाचे नाव असून, ते लवकरच कमी दरात बाजारात येणार आहे. दररोज घेतलेल्या इतर दोन औषधी गोळ्यांपेक्षा ते अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चाचणी का महत्त्वाची?

एचआयव्हीपासून वाचविण्यासाठी आपल्याकडे १०० टक्के संरक्षण देणारे औषध आहे हीच सध्या मोठी आशा आहे. गेल्या वर्षी, जागतिक स्तरावर १३ लाख लोकांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. मात्र २०१० मध्ये आढळलेल्या २० प्रकरणांपेक्षा हे प्रमाण कमी आहे. असे असले तरीही २०२५ पर्यंत जगात एचआयव्ही नवी प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी किंवा २०३० पर्यंत एड्सला संपविण्याचे यूएनएड्सचे लक्ष पूर्ण करणे कठीण आहे.

हा पर्याय महत्त्वाचा

एचआयव्हीसाठी स्वयं-चाचणी, कंडोमचा वापर, लैंगिक संक्रमित संसर्गासाठी चाचणी आणि उपचार, बाळंतपणाची क्षमता असलेल्या महिलांसाठी गर्भनिरोधक औषधांचा प्रवेश आदी आवश्यक आहे. तरीही, आपल्याला विशेषतः तरुणांमध्ये संसर्ग रोखण्यात अपयश आले आहे. तरुणांमध्ये संभोगाच्या वेळी दररोज गोळी घेणे किंवा कंडोम वापरणे यामधील निर्णय खूप कठीण आहे. त्यामुळे वर्षातून दोनदा इंजेक्शन हा पर्याय अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.