Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठाणे :- संतापजनक! शिक्षिकेच्या पतीकडून विध्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

ठाणे :- संतापजनक! शिक्षिकेच्या पतीकडून विध्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार 


ठाणे : खासगी शिकवणीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवीयन विधार्थिनींवर वर्गातच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक बाब म्हणजे खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षेकेच्या पतीने हे घृणास्पद कृत्य केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शिक्षेकेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहितासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून शिक्षकेचा पती फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवीयन विद्यार्थिनी अंबरनाथ पूर्वेतील परिरातील एका खासगी शिकवणी वर्गात दोन वर्षांपासून जात होती. त्यातच या ठिकाणी खासगी शिकवण घेणाऱ्या शिक्षिकेच्या पतीची वाईट नजर या पीडित विधार्थिनीवर पडल्याने तो लैंगिक अत्याचाराची संधी शोधत होता. अशातच २१ जुलै रोजी गुरु पौर्णिमा असल्याने शिकवणी वर्गात येणाऱ्या विध्यार्थांना बोलावले होते. त्यानंतर शिकवणी घेऊन झाल्यानंतर वर्ग शिक्षिकेने पीडित मुलीला वरच्या खोलीतील वर्गात काही साहित्य नेण्यास सांगितले. त्यावेळी त्या वर्ग खोलीत शिक्षिकेचा आरोपी पती असल्याने पीडित मुलीने भीतभीत साहित्य नेले. मात्र, खोलीत न जाता ते सामान दरवाज्यात ठेवत असतानाच आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केला.
या घटनेमुळे पीडित मुलगी भयभीत झाल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. मात्र त्या दिवशी पाऊस जोरदार पडत असल्याने पीडित मुलीला घरी येण्यास उशीर झाल्याने तिचे वडील शिकवणी वर्गात येऊन तिला घरी नेले. दरम्यान घटनेच्या दिवशी रात्री घरात जेवण करत असताना अचानक पीडित मुलीने आई वडिलांना सांगितले की उद्यापासून मी शिकवणी वर्गात जाणार नाही. केवळ शाळेत जाणार असे बोलताच आई वडिलांना काहीतरी आपल्या मुलीसोबत घडलं असा समज होऊन तिच्याकडे अधिक चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

१९ जुलै ते २१ जुलैपर्यत हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार शिक्षिकेचा आरोपी पती करत असल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन आईने २२ जुलै रोजी सोमवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग सांगताच पोलिसांनी शिक्षेकेच्या पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी शिकवणी वर्गातील विधार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.