Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

येरवड्यात सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या

येरवड्यात सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या 


पुणे शहरातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुधीर गवस उर्फ बाळू गवस (वय 25 वर्षे) असे मृत व्यक्तीचं नाव असून तो काही दिवसांपूर्वी येरवडा तुरुंगातून बाहेर आला होता. सुधीर गवस यांची बुधवारी (17 जुलै) मध्यरात्री धारदार शस्त्राने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सुधीर गवस याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. सुधीर गवस याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


काय आहे हे प्रकरण?
सुधीर गवस हा सराईत गुन्हेगार होता. तो येरवडा येथील जयप्रकाश नगरात राहत होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याची येरवडा तुरुंगातून सुटका झाली होती. मात्र, आचार्य कुटुंबासोबत त्याचे पूर्वीपासून वाद सुरू होते. सुधीर आणि आचार्य कुटुंबीयांमध्ये मंगळवारी कडाक्याचे भांडण झालं होतं. वाद विकोपाला जाऊन बुधवारी (17 जुलै) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सुधीर गवस यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि रविकिरण रामचंद्र आचार्य यांना पोलिसांनी अटक केली आहे.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर आणि आचार्य कुटुंबीयांमध्ये मंगळवारी कडाक्याचे भांडण झालं होतं. वाद विकोपाला गेला. मारेकरी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि रविकिरण रामचंद्र आचार्य हे तिघे सुधीरवर तुटून पडले. अखेर सुधीर याने तिथून पळ काढला. तिघे मारेकरी सुधीरचा पाठलाग करत होते. अखेर सुधीर हा येरवडा परिसरातील एका दुकानामागे लपल्याचे मारेकऱ्यांना समजते. मारेकऱ्यांनी सुधीरला पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. सुधीरचा जागेवरच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि रविकिरण रामचंद्र आचार्य या तिघांना अटक केली आहे. येरवडा पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर गवसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.