Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'खजिन्याच्या' शोधात शेतात पोहोचले, जमीन खोदताच दिसलं असं काही की डोळे विस्फारले

'खजिन्याच्या' शोधात शेतात पोहोचले, जमीन खोदताच दिसलं असं काही की डोळे विस्फारले

भोपाळ : पोलिसांना एका शेतात असं काही सापडलं, की सगळेच थक्क झाले. पोलिसांनी शेतातून 54 किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांची किंमत सुमारे 53 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरट्यांनी त्यांची चोरी केली होती. चोरीनंतर चोरट्यांनी हे दागिने मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यातील बिलाखेडी गावात आणून पुरले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी चोरीचा माल जप्त केला. अशा प्रकरणात पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

गुनाचे एसपी संजीव कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना बिलाखेडी गावातील सगुणबाई पारडी यांच्या शेतात दागिने पुरल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. यावर एसडीओपी राघोगड दीपा दोडवे आणि धरणवाडा पोलीस ठाण्याचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी शेतात खोदले असता मोठं काहीतरी हाती लागलं. ते उघडलं असता वेगवेगळ्या कापडी पिशव्यांमध्ये ठेवलेले चांदीचे दागिने आढळून आले. चांदीचे एकूण वजन 54.300 किलो असल्याचे आढळून आले. कपिल अग्रवाल यांच्या नावाचे आधार कार्डही पाकिटांमध्ये आढळून आले. गुना पोलिसांनी राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस ठाण्यात माहिती दिली.

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस स्टेशन हद्दीतील गोवर्धनलाल बनवारी अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या घरात 13 जून रोजी चोरीची घटना घडली होती. त्याच रात्री चोरट्यांनी खिडकीची काच कापून घरात प्रवेश केला. ते मोटार पार्ट्सचे व्यापारी आहेत. दागिने तारण म्हणूनही काम करतात. 13 जून रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास मुखवटा घातलेले सहा चोरटे खिडकीची जाळी आणि अँगल कापून मागील खोलीत घुसले.

या खोलीत कपाट ठेवण्यात आलं होतं. व्यावसायिकाचं कुटुंब पहिल्या मजल्यावर झोपलं होतं. चोरट्यांनी लॉकर फोडून त्यात ठेवलेले चांदीचे दागिने चोरून नेले. सुमारे एक ते दीड तास चोर खोलीत थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता व्यावसायिकाने आपल्या मुलाला दागिने काढण्यासाठी खोलीत पाठवले असता दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. दरवाजा उघडला असता सामान अस्ताव्यस्त पडलेले असून 12 पैकी 10 लॉकर तुटलेले होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.