Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-वाढदिवसाची पार्टी करून थेट 'स्पा' मध्ये आला आणि अनोळखी लोकांनी केले सपासपा वार... हत्येमुळे खळबळ

मुंबई :-वाढदिवसाची पार्टी करून थेट 'स्पा' मध्ये आला आणि अनोळखी लोकांनी केले सपासपा वार... हत्येमुळे खळबळ 


विलेपार्ले येथे राहणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या हरी वाघमारे(५०) या व्यक्तीची बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास वरळीच्या ' सॉफ्ट टच स्पा ' मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी वरळी पोलिसांनी घटना घडली तेव्हा हरीसोबत स्पामध्ये हजर असलेली तरुणी आणि हत्या घडण्यापूर्वी स्पा मधून बाहेर पडलेल्या तीन पुरूष कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या हत्येबाबतची माहिती एखाद किलोमिटर अंतरावर असलेल्या वरळी पोलिसांना बुधवारी दुपारी दोनच्या आसपास मिळाली. सोबत असलेल्या महिलेने त्याचवेळी पोलिसांना या घटनेची माहिती का दिली नाही, याबाबत चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

ग्राहक म्हणून हरीची या स्पामध्ये वरचेवर ये जा होती. त्यामुळे स्पा चालक आणि कर्मचारी त्याचे परिचित होतें १७ जुलैला त्याचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त पार्टी देण्याचा हट्ट या कर्मचाऱ्यांनी केला. हरी आणि स्पातील चौघांनी शीव परिसरात पार्टी झोडली. दोनच्या आसपास ते पुन्हा स्पामध्ये परतले. यातील तरुणी आणि हरी एका खोलीत गेले. काही वेळाने तीन पुरुष कर्मचारी स्पामधून बाहेर पडले. त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी स्पामध्ये प्रवेश केला आणि हरी याच्यावर धारदार हत्याराने बरेच वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समजते.

दुपारी हत्येची माहिती मिळताच वरळी पोलीस पथकासोबत परिमंडळ तीनचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरी याचा मृतदेह शव चिकित्सेसाठी नायर रुग्णालयात पाठविण्यात आला. अनोळखी व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती उपायुक्त उपाध्याय यांनी दिली. हरी याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.