Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरकारी अधिकार्यांच्या समोरच अचानक महिलांनी कपडे उतरवले, जिल्हाधिकारी कार्यालयात उडाली खळबळ

सरकारी अधिकार्यांच्या समोरच अचानक महिलांनी कपडे उतरवले, जिल्हाधिकारी कार्यालयात उडाली खळबळ 


लग्नाच्या दिवशीच चोरीच्या आरोपात पकडण्यात आलेल्या तरुणाचा मध्य प्रदेशातील गुना येथे पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. यामुळे या तरुणाच्या कुटूंबाने सरकारी कार्यालयात येऊन आक्रोश केला. मृताच्या कुटूंबातील महिलांनी न्याय करण्याची मागणी करत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळ घातला.
महिलांनी संतापाच्या भरात आपले कपडेही काढून फेकले. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घालून कसे तरी त्यांना परत पाठवले. जिल्हाधिकारी डॉ. सतेंद्र सिंह यांनी याप्रकरणाचा योग्य तपास करण्याचा तसेच दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
गुना जिल्ह्यातील झांगर पोलिसांनी देवा पारदी आणि त्यांचा चुलता गंगाराम पारदी यांना रविवारी चोरीच्या आरोपात पकडले होते. त्याच दिवशी देवाचे लग्न होते व त्याची वरात गुना शहरातील गोकुल सिंह चक्क येथे जाणार होती. मात्र त्याच रात्री कुटूंबीयांना देवाच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यानंतर मिनी ट्रक भरून महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. देवाच्या होणाऱ्या नवरीने स्वत:वर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. चुलती सूरजबाई यांनी पेटवून घेत आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सोमवारी कुटूंबीयांनी तिच्या मृतदेहावर भोपाळमध्ये पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली. मजिस्ट्रियल तपासावर त्यांचा विश्वास नाही.
एडिशनल एसपी मान सिंह ठाकुर यांनी सांगितले की, म्याना परिसरातील भिडरा गावात झालेल्या चोरीच्या घटनेप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी देवा पारदी आणि गंगाराम पारदी यांना ताब्यात घेतले होते. रविवार सायंकाळी पोलीस दोघांना घेऊन चोरीच्या सामानांची रिकव्हरी करण्यासाठी जात होते. त्यावेळी देवाच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्याला म्याना येथील रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर ४५ मिनिटांपर्यंत उपचार करण्यात आले. सीपीआरही दिले गेले मात्र त्याला वाचवता आले नाही.पोलिसांनी सांगितले की, त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्याविरोधात ७ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी अटक केली तेव्हा तो नवरदेवाच्या वेशभूषेत होता. त्याची वरात जाणार होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.