Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुमचा भाडेकरू घर भाडे देत नसेल तर आशावेळी तुम्ही काय कराल? जाणून घ्या महत्वाची माहिती

तुमचा भाडेकरू घर भाडे देत नसेल तर आशावेळी तुम्ही काय कराल? जाणून घ्या महत्वाची माहिती 


रिअल इस्टेट क्षेत्रामधील जर गुंतवणूक किंवा एखादे घर किंवा फ्लॅट जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्याच्यामागे आपले दोन उद्दिष्ट असतात. यातील पहिले जर म्हटले तर प्रॉपर्टीची खरेदी करणे हा एक महत्त्वाचा उद्देश असतो तर दुसरा म्हणजे घेतलेली ही मालमत्ता भाड्याने देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याचा उद्देश असतो. जास्त करून आपण पाहतो की घर किंवा फ्लॅट घेऊन ते भाडे स्वरूपात दिले जातात. आपल्याला माहित आहे की, यामध्ये भाडेकरू कडून मासिक स्वरूपामध्ये घरमालकाला भाडे मिळत असते.

परंतु बऱ्याचदा किंवा बऱ्याच ठिकाणी अशी समस्या दिसून येते की भाडेकरू घरमालकाला वेळेवर भाडे देतच नाही किंवा भाड द्यायलाच नाकारतो. तेव्हा खूप मोठी समस्या घरमालकांसमोर उभी राहते. अशावेळी नेमके घर मालकाने काय करायला हवे? हे घर मालकाला ठाऊक असणे तितकेच गरजेचे असते.

भाडेकरूघरभाडेदेतनसेलतरयागोष्टीकरा

1- अगोदरतुमचाघरभाडेकरारतपासा– जेव्हा आपण भाडेकरूला घर भाड्याने देतो तेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये एक रेंट एग्रीमेंट झालेले असते. सगळ्यात अगोदर ते एग्रीमेंट किंवा तो करार तपासून घेणे गरजेचे आहे. हा करार करताना घर मालकाकडून भाडेकरू करिता कोणत्या पद्धतीच्या अटी घालून देण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

भाडेकरू घरभाडे देत नसेल तर या गोष्टी करा

1- अगोदरतुमचाघरभाडेकरारतपासा– जेव्हा आपण भाडेकरूला घर भाड्याने देतो तेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये एक रेंट एग्रीमेंट झालेले असते. सगळ्यात अगोदर ते एग्रीमेंट किंवा तो करार तपासून घेणे गरजेचे आहे. हा करार करताना घर मालकाकडून भाडेकरू करिता कोणत्या पद्धतीच्या अटी घालून देण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

साधारणपणे करार करताना या करारामध्ये भाडेकरूने घरभाडे वेळेत देणे बंधनकारक आहे अशा प्रकारची तरतूद यामध्ये असतेच. त्यामुळे या अटीचे पालन जर भाडेकरू कडून झाले नाही तर घर मालकाला भाडेकरूला घरात बाहेर काढण्याचा अधिकार आहे. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यासंबंधीची माहिती नोटीसीच्या माध्यमातून भाडेकरूला एक महिन्याआधी द्यावी लागते.

2- डिपॉझिटघेणे– जेव्हा आपण कोणतेही मालमत्ता भाड्याने देतो तेव्हा घरमालक भाडेकर कडून सिक्युरिटी म्हणून डिपॉझिट पोटी काही रक्कम घेतो. समजा अशा परिस्थितीमध्ये भाडेकरने भाडे दिले नाही किंवा भाडेच द्यायचे नाही म्हटले तर घर मालक भाडेकरूने दिलेल्या डिपॉझिट मधून घरभाड्याची रक्कम वजा करू शकतो. डिपॉझिट रक्कम मुळे घरमालकाचे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होत नाही.

3- कायदेशीरनोटीसपाठवणे– भाडेकरू कडून निश्चित केलेल्या तारखेला जर घरभाडे देण्यामध्ये टाळाटाळ होत असेल तर भाडेकरारानुसार घरमालक भाडेकरू विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतो. भाडेकरू ने भाडे वेळेस दिले नाही किंवा इतर नियमांचे पालन केले नाही तर घरमालक भाडेकर विरुद्ध इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 अंतर्गत कायदेशीर नोटीस पाठवू शकतो.

4- न्यायालयातखटलादाखलकरणे– समजा तुम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आणि तरी देखील भाडेकरूने भाडे वेळेवर दिले नाही किंवा तुमचे रूम देखील खाली केली नाही तर घरमालक कोर्टात खटला दाखल करू शकतो. यामध्ये जर भाड्याची रक्कम कमी असेल तर हा कटला सिविल कोर्टामध्ये दाखल केला जातो.

त्याउलट मात्र भाड्याची रक्कम मोठी असेल तर हा खटला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टामध्ये देखील दाखल केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये कोर्टात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेते व पुरावे जर भाडेकरू विरोधात असतील तर निकाल घर मालकाच्या बाजूने लागतो.

अशामध्ये कोर्ट भाडेकरूला थकित भाडे भरण्याचा आदेश जारी करेल किंवा भाडेकरूला बेदखल करण्याचा निर्णय देखील घेऊ शकतो. भाडेकरूला बेदखल करायचे की नाही याचा निर्णय घरमालक कोर्टाच्या मदतीने घेऊ शकतो. ही थोडी वेळखाऊ प्रक्रिया असते. परंतु ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाडेकरूला संपूर्ण भाडे देणे बंधनकारक असते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.