Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली; महिलेला घरात घुसून लुटणाऱ्या तिघांना अटक ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

सांगली; महिलेला घरात घुसून लुटणाऱ्या तिघांना अटक ९० हजारांचा मुद्देमाल जप्त


सांगली : शहरातील संजयनगर येथील महिलेच्या घरात रात्री घुसून चाकूच्या धाकाने तिचे दागिने लंपास करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने, मोबाईल असा ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संजयनगर पोलिसांनी हौं कारवाई केली.

वाहीद मुसा पखाली (वय ४९, रा. शिंदे मळा), सलीम मेहबूब शेख (वय ३५, रा. टिंबर एरिया), तातोबा लक्ष्मण कांबळे (वय ५०, रा. नवीन वसाहत, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. ५ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तिघेही संशयित संजयनगर येथील दत्त कॉलनीत राहणाऱ्या संगीता ठोंबरे यांच्या घरात घुसले. त्यांनी महिलेच्या पोटाला चाकू लावून तसेच गळ्याला विळा लावून तिने घरात ठेवलेले दागिन लंपास केले होते. याप्रकरणी महिलेने संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सांगली शहरचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी यातील संशयितांना तातडीने पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संतोष पुजारी, सुशांत लोंढे यांना ही जबरी चोरी वरील तीनही संशयितांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने तिघांनाही सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंत त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडील चोरीचे दागिने, मोबाईल असा ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.

पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक बयाजीराव करळे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक दिलावर सय्यद, विनौद साळुंखे, संतोष पुजारी, दीपक गायकवाड, नवनाथ देवकते, सुशांत लोंढे, आकाश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.